खेडीढोक येथील सरपंचावर आत्महत्येस प्रवृत्त करणे तसेच विविध कलमानुसार गुन्हा दाखल. खेडीढोक येथील रहिवाशी धनसिंग पाटील यांना केले होते आत्महत्येस प्रवृत्त.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२९/०१/२०२१
पारोळा तालुक्यातील खेडीढोक गावाचे सरपंच चांगदेव पाटील यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त करणे तसेच इतर कलमाअन्वये काल रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, खेडीढोक येथील रहिवासी असलेले धनसिंग गुलाब पाटील यांनी गेल्या २ वर्षांपासून सरपंच यांच्या सांगण्यावरून ग्रामपंचायत शिपाई यांच्या कडे घरपट्टी व पाणीपट्टी सुमारे ३ हजार रुपये दिली होती. मात्र गेल्या २ वर्षांपासून तर आज पर्यंत ग्रामपंचायतीने पावती न दिल्याने पीडित धनसिंग पाटील यांनी विचारणा केली असता सरपंच यांनी त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. व जादा पैशांची मागणी देखील केली. व पीडित यांच्या पत्नीला शिवीगाळ देखील केली. याच्या मनस्तापात धनसिंग पाटील यांनी दिनांक २३ रोजी विषारी द्रव्य सेवन केले असता त्यांना पारोळा कुटीर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र परिस्थिती जास्त खराब होत असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचा आज धुळे येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. या भांडणात सरपंच यांच्या सोबत इतर २ लोकांचा देखील सहभाग आहे असे पीडित यांच्या पत्नीने फिर्यादीत म्हटले आहे. म्हणून संबंधित तीन लोकांविरुद्ध भारतीय दंड संहिता ३०६, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र गुन्हा दाखल होताच सरपंच चांगदेव पाटील यांनी गावातून पळ काढला आहे व अजूनही फरारच आहेत.
पोलीस प्रशासन संबंधित आरोपीस वाचण्याचा प्रयत्न करीत आहे. असा आरोप धनसिंग पाटील यांच्या नातेवाईकांनी केला आहे. फिर्यादींनी गेल्या 4 दिवसांपूर्वी पोलिसांच्या सांगण्यावरून तक्रार अर्ज दिला होता त्यात महिलेचा विनयभंग तसेच खंडणीचा देखील उल्लेख दिसतो. मात्र पोलिसांनी या कलमांचा काहीही उल्लेख केला नसल्याने पीडितच्या नातेवाईकांमधून संतापाच्या भूमिका उमटत आहे.