प्रभु श्रीरामचंद्र प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी पाचोरा शहरातील मांस व मद्य विक्रीची बंद ठेवण्यासाठी भाजपाची मागणी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/०१/२०२४
प्रभु श्रीरामचंद्र यांची जन्मभूमी तसेच जैन धर्मीयांच्या २४ तीर्थंकरापैकी पाच तीर्थंकारांचे जन्मभूमी असलेल्या अयोध्या या पावन नगरीत येत्या २२ जानेवारी २०२४ सोमवार रोजी मंगलमय व आनंदी वातावरणात प्रभु श्रीरामचंद्र यांच्या प्रतिमेचा प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने संपूर्ण देशभरातील मंदिरांना रंगरंगोटी करुन त्यावर भगवा झेंडा फडकवून विद्युत रोषणाई करण्यात येणार असून गावागावातून कलश यात्रा, किर्तन, भजन, प्रवचन तसेच घराघराला तोरण बांधून, घराच्या छतावर भगवा फडकवून तसेच घराघरात दिवे लावून आनंदोत्सव साजरा करावा असे आवाहन भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी तमाम जनतेला केले आहे. अशा हे भक्तिमय वातावरणात म्हणजे एक दिपावलीच साजरी करण्यात येणार आहे.
तसेच या दिवशी मुक्या प्राण्यांना सुध्दा आनंदाने जगण्याचा व खेळण्या, बागडण्याचा अधिकारी आहे. या अनुषंगाने आपण सगळ्यांनी मिळून मुक्या प्राण्यांना सुध्दा (जिओ और जिने दो) हा मूलमंत्र घेऊन आनंदोत्सवात अजून भर पडावी म्हणून दिनांक २२ जानेवारी २०२४ सोमवार रोजी पाचोरा शहरातील सर्व मद्यविक्रीची दुकाने, बिअर बार, सर्व अधिकृत, अनाधिकृत कत्तलखाने तसेच गावपातळीवर मांसविक्रीच्या व्यवसायासाठी केली जाणारी पशुहत्या बंद ठेवण्याची मागणी भारतीय जनता पार्टी पाचोरा शहर व तालुक्याच्या वतीने करण्यात आली असून या आशयाचे निवेदन पाचोरा नगरपरिषद व पाचोरा पोलीस स्टेशनला देण्यात आले आहे.
याप्रसंगी शहराध्यक्ष दिपक माने, जगदीश पाटील, समाधान मुळे, विष्णू अहिरे, स्वप्नील सोनार, योगेश ठाकुर, राहुल गायकवाड, विरेंद्र चौधरी, प्रदिप पाटील, मनीष भावसार, सोहन मोरे, गोकुळ दारकुंडे, आशिष जाधव, अमोल वाघ आदी पदाधिकारी उपस्थित होते.