पाचोरा येथे आयर्न गृप युवा फाऊंडेशनतर्फे रक्तदात्यांचा सन्मान.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२९/०१/२०२१
पाचोरा – भडगाव तालुक्यातील आयर्न गृप युवा फांऊडेशनच्या प्रथम वर्धापण दिना निमित्त या ग्रुपतर्फे रक्तदात्यांचा सन्मान सोहळा प्रजासत्ताक दिनी आयोजित करण्यात आला होता.. यावेळी युवानेते तथा भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलचे संचालक डॉ. भुषण मगर, सिध्दीविनायक मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलचे संचालक डॉ. स्वप्निल पाटील, संजीवनी हाॅस्पिटलचे संचालक डॉ. पवनसिंग पाटील, चिंतामणी हाॅस्पिटलचे संचालक डॉ. विशाल पाटील, कौशल्या लॅबोरेटरीचे संचालक डॉ. गोरख महाजन, बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हरिभाऊ पाटील, डॉ. वैभव सुर्यवंशी यांच्या हस्ते पाचोरा – भडगाव तालुक्यातील रक्तदात्यांचा सत्कार करण्यात आला.
आयर्न युवा ग्रुप फाऊंडेशनच्या माध्यमातून फक्त रक्त दानच नव्हे तर नेत्र तपासणीचे शिबिर सुध्दा घेतले जातात. व त्याच सोबत डोळे तपासून शिबिरामध्ये ज्या लोकांना मोतीबिंदू चा प्रॉब्लेम आढळुन येतो त्या रुग्णांना आर्यन ग्रुप तर्फे स्व: खर्चाने मोतीबिंदू चे ऑपरेशन केले जाते. आजवर त्या लोकांना आपल्या डोळ्यांनी दिसायला लागले आहे. अशा सुमारे ४०० लोकांचे डोळ्यांचे ऑपरेशन शिबिर आयोजित करुन आयर्न युवा ग्रुप फाऊंडेशनने केले आहे. त्यांच्या या कार्याबद्दल सर्वच स्तरातून आयर्न युवा ग्रुप फाऊंडेशनचे कौतुक केले जात आहे.
रक्तदात्यांच्या सत्कार समारंभा प्रसंगी आयर्न युवा ग्रुप फाऊंडेशनचे अध्यक्ष आयर्न लखन मोरे, उपाध्यक्ष भुषण अशोक पाटील(मोनु) , मार्गदर्शक यशवंत तुकाराम मांडोळे, सचिव आनंद प्रकाश शिंदे, धनराज पाटील, मछिंद्र जाधव व आयर्न ग्रुप चे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित राहुन कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.