सोयगाव येथील पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी व पोलिसात खोटी तक्रार करणाऱ्या एस. टी. डेपो. व्यवस्थापकावर पत्रकार सरंक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करा ; महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची मागणी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२२/०८/२०२१
सोयगाव येथील एस.टी.आगार प्रमुखाच्या निष्काळजीपणामुळे सोयगाव तालुक्यातील खेडेगावच्या विद्यार्थ्यांना वेळेवर एस.टी. बस उपलब्ध न झाल्यामुळे नऊ विद्यार्थी नवोदय शिष्यवृत्ती परीक्षेपासून वंचित राहिले आहे.
ही बातमी वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झाल्यावर या आशयाची बातमी वृत्तपत्रांमध्ये का दिली असे म्हणत पत्रकार विजय पगारे यांना दूरध्वनीवरून बघून घेतो, अशी धमकी देत पोलिसात खोटी तक्रार करणाऱ्या सोयगाव एस.टी. आगार व्यवस्थापकवर पत्रकार हल्ला विरोधी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सोयगाव तालुका शाखेतर्फे पोलीस अधीक्षक (ग्रामीण) औरंगाबाद यांच्याकडे रविवारी (दी.२२) करण्यात आली आहे. या निवेदनाची एक प्रत सोयगाव पोलीस स्टेशन येथे देण्यात आली आहे.
सोयगाव तालुक्यांमध्ये नुकत्याच पुर्व उच्च माध्यमिक व पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षा सोयगाव,बनोटी,सावळदबारा केंद्रावर घेण्यात आलेल्या होत्या. या परीक्षेसाठी एस.टी. महामंडळाच्या सोयगाव आगरातर्फे नियमित शेड्युल सुरु असतांनाच नियमित चालणारे शेड्यूल्ड बंद करून विद्य्रार्थ्यांना परिक्षेपासून वंचित ठेवल्या प्रकरणी पत्रकार विजय पगारे यांनी एका दैनिकातुन तश्या आशयाचे वृत्त प्रसिद्ध केले होते.
याचा राग येऊन आगार प्रमुख हिरालाल ठाकरे यांनी स्वातंत्र्यदिनीन पत्रकार पगारे यांना द्वेष भावनेतून फोनवरून माझी व एसटीची बदनामी झाली, मी तुमच्या विरोधात कोर्टात केस करतो,अशा बातम्यांनी माझ्यावर काही परिणाम होत नाही, मी तुला बघून घेतो अशी धमकी दिली आहे.
त्यांनतर दिनांक १९ ऑगस्टला सोयगाव एस.टी. बस्थानक येथील शिवामृत दूध डेअरी येथे येऊन त्यांनी शिवीगाळ करीत एस.टी. बसच्या चाकाखाली चिरडून टाकण्याची धमकी दिली. व सोयगाव पोलीस स्टेशनला पत्रकार पैशांची मागणी करीत असल्याची खोटी तक्रार दिली आहे. खोटी तक्रार देण्यामागचे कारण म्हणजे सोयगाव आगार प्रमुखांचा स्वताचा मनमानी कारभार, नाकर्तेपणा व इतर बाबींवर पडदा पाडण्यासाठीचा हा केविलवाणा प्रकार असल्याचे मत सोयगाव परिसरातील सुज्ञनागरीक, पत्रकार व बसस्थानक परिसरातील व्यवसायीकांनी बोलुन दाखवले आहे.
म्हणून या घटनेचा निषेध करण्यासाठी व लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची मुस्कटदाबी करणाऱ्या व एस.टी.प्रवाशांची गैरसोय करणाऱ्या सोयगाव आगर प्रमुखाचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने तालुका अध्यक्ष भारत पगारे यांच्या अध्यक्षतेखाली निषेध सभा घेऊन तीव्र निषेध करण्यात आला.
या निषेध सभेत आडदांड व हेकेखोर आगार व्यवस्थापकावर तात्काळ पत्रकार सरंक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात यावा तसेच पत्रकार विजय पगारे यांना संरक्षण देण्यात यावे असे सर्वानुमते ठरवण्यात आले तसे मागणीचे निवेदन सोयगाव पोलीस स्टेशनला आले आहे. या निवेदनाची प्रत अधिक माहितीसाठी पोलीस अधीक्षक (ग्रामीण) मोक्षदा पाटील यांना पाठविण्यात आली आहे.
या निवेदनावर पत्रकार रवींद्र काटोले,दत्तू काटोले, संभाजी पवार,राजू दुतोंडे, ईश्वर इंगळे,सुनील काळे, ,पूनम परदेशी,विजय काळे, सुलेमान शेख, गुलाब शेख, रमेश पाटील, शिवाजी महाकाळ व अनिल रावळकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
[सपोनि सुदाम शिरसाठ यांची निवेदन घेण्यास टाळाटाळ केल्याचा सोयगाव पत्रकार संघटनेचा आरोप.]
लोकशाहीत राज्यात मोर्चा, धरणे आंदोलन, उपोषण व इतर विषयावर कोणीही निवेदन किंवा तक्रार देण्यासाठी आले असता सर्वातप्रथम संबधीतांचे म्हणणे ऐकून घेत निवेदन स्विकारले पाहिजे, नंतर चौकशीअंती न्यायनिवाडा केला पाहिजे परंतु सोयगाव येथील पत्रकार बांधव हे आज निवेदन देण्यासाठी येणार असल्याचे ज्ञात असूनही जेव्हा पत्रकार सोयगाव पोलिस स्टेशनला निवेदन देण्यासाठी गेले तेव्हा सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.श्री. सुदाम शिरसाट यांनी पत्रकारांचे निवेदन घेण्यासाठी मुद्दामहून टाळाटाळ केली व आमचे निवेदन पी.एस.ओ.यांच्याकडे देण्यासाठी सांगितले मात्र दुसरीकडे विविध पक्ष व संघटनेचे निवेदने स्वीकारण्यासाठी पोलीस अधिकारी तत्पर असतात असा आरोप पत्रकार संघटनेकडून केला जात आहे.