जागतिक महिला दिनानिमित्त अंबे वडगाव येथे, सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांचा सत्कार.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/०३/२०२३

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अंबे वडगाव येथील महिला सौ. रुपाली चंद्रे, सौ. छाया शिंदे, सौ. अपर्णा शिंदे, सौ. सरलाताई पाटील प्रतिभाताई भुसारे व सौ. सुरेखा जैन. यांनी उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या जेष्ठ नेत्या सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांच्यातर्फे नुकताच सत्कार करण्यात आला.

पाचोरा तालुक्याच्या राजकीय पटलावर विधानसभा किंवा लोकसभेच्या महत्वाच्या पदावर आजपर्यंत एकही महिला विराजमान झालेली नाही. त्यामुळे महिलांसाठी पाहिजे तेवढ्या सुविधा व योजना राबविण्यात आलेल्या नाहीत. सगळीकडे महिलांच्या सक्षमीकरणासाठी फक्त उदोउदो केला जातो परंतु आजही ग्रामीण भागातील महिलांची कुचंबणा होते आहे. सरपंच, उपसरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हापरिषद सदस्य किंवा तंटामुक्ती अध्यक्ष असो वा महिला पोलिस पाटील असो यांची शासनाच्या नियमानुसार महिला राखीव पदावर नियुक्ती केली जाते या बऱ्याचशा ठिकाणी महिलाराज फक्त नावालाच दिसून येते व त्यांच्या जागेवर (पदावर) पतिराज किंवा घरातील जेष्ठ, श्रेष्ठ नातेवाईक त्याचा कारभार पहात आहेत. ही बाब एवढ्यावरच थांबत नाही तर मासिक मीटिंग, ग्रामसभा, विविध ठराव व महत्वाच्या ठिकाणी व कागदपत्रांवर महिलांच्या सहृया त्याचे पति किंवा घरातील महत्वाच्या व्यक्ती करत असतात.

यामुळे कोणत्याही कार्यालयात महिला उपस्थित रहात नसल्याने गावागावातून इतर महिला संबंधित कार्यालयात किंवा सभांमध्ये उपस्थित राहु शकत नाही. व महिलांच्या समस्या तश्याच राहून जात आहेत. म्हणून आमच्या पाचोरा तालुक्यासाठी सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांच्या माध्यमातून आम्हाला एक चांगल्या महिला कार्यकर्त्या लाभल्यामुळे आमच्या आशा, आकांशा वाढल्या आहेत असे मत उपस्थित महिलांनी व्यक्त केले.