पाचोरा पोलिस स्टेशनला बेवारस दुचाकी , ओळख पटवा व घेऊन जा .

Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
पाचोरा पोलीस स्टेशन येथे सुमारे तब्बल २६ बेवारस मोटारसायकली जप्त करण्यात आलेल्या असुन सदर बऱ्याच दिवसांपासुन पाचोरा पोलीस स्टेशनला पडुन आहेत. सदर वाहनांची यादी पोलीस स्टेशनला प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर वाहनांचे मालकांचा पोलीस स्टेशन कडुन शोध घेण्यात येत आहे. संबंधीतांनी गाडीची मुळ कागदपत्र ओळखपत्र व मालकी हक्काचा पुरावा सादर करुन सदर वाहने घेवुन जाण्याचे आवाहन मा. पोलीस निरीक्षक पाचोरा पोलीस स्टेशन यांचेकडुन करण्यात आले आहे. मुदतीत वाहनांची ओळख पटवुन न नेल्यास सदर वाहनांचा लिलाव करण्यात येईल असेही स्पष्ट करण्यात आलेले आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.