भावा-बहिणीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना सख्या चुलत भावानेच बहिणीसोबत केले धक्कादायक कृत्य.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०६/०६/२०२३
राज्यासह जळगाव जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवर होणारे अन्याय, अत्याचार, अपहरण या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतांना दिसत आहेत. अशातच भावा, बहिणीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी एक घटना पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीतील गावात उघडकीस आली असून सख्ख्या चुलत भावानेच उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये आजीकडे आलेल्या एका १३ वर्षीय चुलत बहिणीसोबत झोपेत असतांना अश्लील कृत्य करत जबरदस्ती करणाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला सख्या चुलत भावाचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की छत्रपती संभाजी नगर येथील रहिवासी एक १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी उन्हाळ्याच्या सुट्टीत पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथे रहात असलेल्या आजीकडे आलेली होती. ही पिडीत मुलगी घरात झोपली असतांना रात्री अकरा वाजेचे सुमारास तीच्या सख्खा चुलत भावाने तिच्याजवळ झोपण्याचे नाटक करत अश्लील चाळे सुरु केले तेव्हा सदर मुलीने विरोध केला असता जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत तीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे.
या घटनेनंतर भयभीत झालेल्या मुलीने घडलेला प्रकार तिच्या नातेवाईकांना सांगितला तसेच पिडीत मुलीने घडलेल्या प्रकाराची तक्रार पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला दिली असता दिलेल्या तक्रारीनुसार बालकांचे लैंगिक अपराधा पासून संरक्षण कायदा २०१२ पोस्को अंतर्गत ३५४/८/१२ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मा. श्री. अमोल पवार हे करीत आहेत.