भरधाव एस. टी. बस खाली तीन शेळ्यांचा चेंदामेंदा, चालकाची शुध्द दादागिरीची भाषा पशुधन पालकाचे दहा हजाराचे नुकसान.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/११/२०२३

जामनेर ते पाचोरा रस्त्यावर वरखेडी ते लोहारी दरम्यान पिरबाब दर्ग्याच्या जवळच आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास परिवहन महामंडळाच्या एम. एच. १४ टी. १८८२ या एस. टी. बस चालकाने भरधाव वेगाने बस चालवून तीन मेढ्यांचा चेंदामेंदा करुन मेंढ्या चारणाऱ्या धनगर समाजाच्या गुराख्याला धक्काबुक्की व दादागिरी करुन पळ काढला आहे.

या अपघातामध्ये धनगर बांधवाचे दहा हजाराचे नुकसान झाले आहे. याबाबत बाहेरगावाहून पोट भरण्यासाठी आलेल्या धनगर बांधवावर एकप्रकारे अन्याय झाला असल्याचे मत तुकाराम तांबे यांनी व्यक्त केले आहे.

ब्रेकिंग बातम्या