पाचोरा तालुक्यात २१५ पशुधन लंम्पी (बाधित) सक्रिय, युध्दपातळीवर लसीकरण मोहीम सुरु.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१०/१०/२०२३

जळगाव जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून गोवर्गीय म्हणजे गाय व बैलांना लंम्पी या त्वचारोगाची लागण झाली आहे. हा संसर्गजन्य आजार असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शासनाने बैल बाजार, गुरांची वाहतूक व बैलगाडा शर्यती वर बंदी घातली होती तसेच पशुधन विभागाकडून लंम्पी प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.

असे असले तरी पाचोरा तालुक्याच्या पशुधन विकास अधिकारी सुजाता मॅडम यांनी दिलेल्या माहितीनुसार पाचोरा तालुक्यात आजपर्यंत एकुण ५८२ गोवर्गीय पशुधन लंम्पी बाधीत झाले होते. यापैकी ३२१ पशुधन उपचारानंतर बरे झाले असून लागण झालेल्या पशुधनापैकी ४६ पशुंचा मृत्यू झाला आहे. तसेच आजच्या परिस्थितीत म्हणजे दिनांक ०९ ऑक्टोंबर २०२३ सोमवार रोजी हाती आलेल्या माहितीनुसार २१५ गोवर्गीय पशुधन लंम्पी सक्रिय आजाराने बाधीत असल्याचे सांगितले आहे. तसेच पशुधन पालकांनी आपापल्या गुराढोरांची योग्य निगा राखल्यास हा आजारावर नियंत्रणात येऊ शकतो असे मत व्यक्त केले आहे.

ब्रेकिंग बातम्या