ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जामनेर तालुक्यातील वडाळी येथे पोळा फुटला परस्परविरोधी दोन्ही गटांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल . ८ जणांना अटक व सुटका .

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१०/१२/२०२०
जामनेर तालुक्यातील पहूर पोलिस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या वडाळी येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभागातील मतदारांची नावे इतर प्रभागाच्या यादीत समाविष्ट झाल्याच्या कारणावरून दोन गट आमने -सामने आल्याची घटना घडली .याप्रकरणी पहूर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी दोन्ही गटांविरुद्ध दंगलीचा गुन्हा करण्यात आला असून ८ जणांना अटक करण्यात आली .दरम्यान आज त्यांना जामनेर न्यायालयासमोर हजर केले असता , त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे .
याबाबत सविस्तर वृत्त असे की , जामनेर तालुक्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक राज कार्यरत आहे .तथापि लवकरच ग्रामपंचायत निवडणुका होणार असून या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील वातावरण थंडीतही तापू लागले आहे .तालुक्यातील वडाळी येथे निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे .राजकीय पदाधिकारी -कार्यकर्ते निवडणुकीच्या अनुषंगाने कामाला लागले आहेत . प्रशासन देखील सज्ज होत आहे . प्रभागातील मतदारांची नावे इतर प्रभागात समाविष्ट झाल्याच्या कारणावरून परस्परविरोधी दोन्ही गट आमने -सामने आले . याप्रकरणी दोन्ही गटांविरुद्ध परस्पर विरोधी दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
या प्रकरणी आकाश त्र्यंबक औटे , रा. वडाळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुधाकर मांगो पाटील , विनोद मांगो पाटील , शिवाजी मांगो पाटील , गजानन सुधाकर पाटील , वसंत दौलत दाभाडे , विजय शांताराम खेते , शांताराम शंकर खेते , मांगो खंडू पाटील , सागर संजय देशमुख (रा .सर्व वडाळी )यांच्या विरुद्ध भारतीय दंड विधान संहीता कलम १४३ / १४७ /१४८ /३२३/५०४ / १३५अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे .
तसेच सुधाकर मांगो पाटील ( रा. वडाळी )यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किशोर सुभाष आवटे ,संदेश किशोर आवटे, गोपाल मधुकर आवटे ,कृष्णा शिवाजी आवटे ,कौतिक सुधाकर आवटे, महेंद्र मोहन आवटे , मधुकर आवटे, आकाश त्र्यंबक आवटे .दरम्यान रात्री १२ वाजेच्या सुमारास दोन्ही गटातील प्रत्येकी ४ जणांना अटक करण्यात आली. अटक केलेल्या सर्व संशयितांना त्यांना आज जामनेर न्यायालयासमोर हजर करण्यात आले . जामनेर न्यायालयाचे न्यायाधीश हवेलीकर यांनी त्यांची जमिनीवर मुक्तता केली असल्याची माहिती तपास अधिकारी पोलीस हेड कॉन्स्टेबल भरत लिंगायत यांनी दिली . या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल भरत लिंगायत व ज्ञानेश्वर बाविस्कर करीत आहेत .