सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जिल्हा परिषदेकडून दत्त माध्यमिक विद्यालयाला कढलेली नोटीस वादळवाऱ्यात उडाल्याचा संशय.

  • अंबे वडगाव तांडा नंबर दोन येथील महादेव मंदिरावर बाबांचे पुनरागमन, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर.

  • पिंप्री धरणावर अनाधिकृत ताबा घेऊन माती उचल करणाऱ्यांकडून सक्तीने वसूली.

  • पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या बदलीसाठी हरीभाऊ पाटील यांचा आंदोलनाचा इशारा.

  • पाचोरा पीपल्स बॅंकेने मुस्ताक पिंजारी यांना दिला पत्ता ठेवून झब्बू, वडिलोपार्जित घराची परस्पर विक्री.

कृषी विषयक
Home›कृषी विषयक›केळीला ‘रेटबोर्ड’ प्रमाणे भाव मिळावा याकरिता शेतकरी संघटनेचे पाचोरा तहसिलदारांना निवेदन.

केळीला ‘रेटबोर्ड’ प्रमाणे भाव मिळावा याकरिता शेतकरी संघटनेचे पाचोरा तहसिलदारांना निवेदन.

By Satyajeet News
December 14, 2021
333
0
Share:
Post Views: 55
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/१२/२०२१

केळी उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा, केळी खरेदी ग्राहकालाही योग्य भावात केळी उपलब्ध व्हावी यासह केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या हितार्थ विविध मागण्यांसंदर्भात पाचोरा तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.

केळी उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा, केळी खरेदी ग्राहकाला ही योग्य भावात केळी उपलब्ध व्हावी तसेच जे शेतकरी यासंदर्भात तक्रारी करतात अशा शेतकऱ्यांची व्यापारी केळी काढणी थांबवून त्या शेतकऱ्यांवर बहिष्कार टाकण्याचा मुस्कटदाबीचा प्रकार करतात हा मुस्कटदाबीचा तात्काळ थांबविण्यात यावा. यासह केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या हितार्थ विविध मागण्यांसंदर्भाचे निवेदन आज दिनांक १४ डिसेंबर बुधवार रोजी पाचोरा तहसिलदार मा.श्री. कैलासजी चावडे यांना निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष नामदेव महाजन, जिल्हाध्यक्ष संजय महाजन, तालुका उपाध्यक्ष सुनिल पाटील, कार्याध्यक्ष स्वरुप राजपूत, प्रदिप परदेशी, सरदारसिंग राऊळ, मनोज पवार, सुभाष गढरी, नगरदेवळा शहराध्यक्ष मयुर मणियार, मुन्नासिंग परदेशी, दगडू राऊळ, मोहनराव पवार, संतोष महाजन यासह नगरदेवळा व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या सहविचारातुन अस्तित्वात आलेली व गेल्या २५ वर्षांपासून यशस्वीतेपणे चालु असलेली “बोर्ड” भाव व बोर्ड भावानुसार “केळी खरेदी” ही संकल्पना केळी व्यापाऱ्यांनी आपापसात लॉबिंग करुन बंद पाडलीय. स्वत:च्या स्वार्थासाठी ‘कोरोनामुळे मालाला उठाव नाही.’ असा बहांना करत “बोर्ड” भावानुसार “खरेदी” पद्धत पुर्णपणे मोडीत काढली आहे.

त्यामुळे खेडेगावापासून शहरापर्यंत सध्या केळीची किरकोळ विक्री ३० ते ५० रुपये प्रति डझन या दराने सुरू असुन सध्या केळीचा बोर्ड भाव १ हजार रुपयांपेक्षा जास्त असतांनाही आणि शेतकऱ्यांना किमान बोर्ड भाव देणे अपेक्षित असतांना बोर्ड भावाच्या २५ ते ३० टक्के दराने म्हणजेच २०० ते ३०० रुपये प्रति क्विंटल एवढा अन्यायकारक व अपमानास्पद कमी दराने खरेदी केली जात आहे.

यामुळे शेतकऱ्यांची प्रचंड प्रमाणात फसवणूक व अवहेलना होत आहे. केळी पीक घेण्यास १२ ते १४ महिन्यांचा कालावधी लागतो. केवळ रात्री विज असल्याने रात्री अपरात्री केळीला पाणी भरावे लागत असते. हे करत असतांना मजुरी व इतर खर्च ही निघणे शक्य नसल्याने पिककर्ज व विज बिल भरण्याची परिस्थिती नसते. यामुळे शेतकरी वर्ग कर्जबाजारी व नैराश्यवश झालेला असून शासनाने वेळीच हस्तक्षेप करून केळी पिकाबाबत गेल्या २५ वर्षांपासून यशस्वीतेपणे सुरु असलेली “बोर्ड” भावानुसार “खरेदी” पद्धत राबविण्यात यावी अशा आषयाचे निवेदन शेतकरी संघटनेतर्फे तहसिलदार मा.श्री. कैलासजु चावडे यांना देण्यात आले. हे निवेदन नायब तहसिलदार मोहन सोनार यांनी स्वीकारुन योग्य तो निर्णय घेण्याबाबत आश्वासित केले आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

उज्ज्वला मोफत गॅस योजनेचा बोजवारा आजीबाईंच्या हातात ...

Next Article

पाचोर्यातील नगरपरिषदेच्या घरपट्टी विरोधात कॉंग्रेस मैदानात मोफत ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorized

    मिलिंद कुळकर्णी यांना मूकनायक तर चंदू नेवे यांना जीवनगौरव पुरस्कार २६ जानेवारी रोजी होणार वितरित जिल्ह्यातील पत्रकार बांधवानी उपस्थित राहण्याचे ...

    January 20, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedमहाराष्ट्र

    शेलगाव येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन.

    December 26, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorized

    गुन्हा दाखल होण्यास विलंब होत असल्याने,

    August 29, 2021
    By Satyajeet News
  • कृषी विषयक

    सत्यजित न्यूजच्या बातमीचा इफेक्ट, अंबाडी शिवारातील शेतकऱ्यांना मिळाला नविन ट्रान्सफॉर्मर.

    February 28, 2022
    By Satyajeet News
  • Uncategorized

    एस.टी.च्या संपामुळे प्रवाशांचा जीव टांगणीला. त्वरीत संप न मिटल्यास प्रवासी संघटना आंदोलनाच्या तयारीत.

    November 7, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    जळगावात शहरात कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात (अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी घेतली पहिली लस)

    January 16, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • पाचोरा तालुका.

    तपासी अधिकाऱ्यांनी माझ्याविरुद्ध खोटा अहवाल बनवल्याचा कुऱ्हाड बुद्रुक येथील सरपंच उदेसिंग वंजारी यांचा आरोप.

  • पाचोरा तालुका.

    निवडणूक काळात भाजपाने दिलेल्या आश्वासनांची आठवण करुन देण्यासाठी कॉग्रेसचे धरणे आंदोलन.

  • पाचोरा तालुका.

    सातगाव डोंगरी येथील स्वस्त धान्य दुकानाचा वाद आता आमदारांच्या दालनात. उद्या होणार दुध का दुध पाणी का पाणी.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज