माजी आमदार कै. ओंकार आप्पा वाघ यांचे स्मरणार्थ आज किर्तन सोहळ्याचे आयोजन.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१०/१०/२०२३
लोकनेते माजी आमदार कैलासवासी ओंकार आप्पा वाघ यांचे स्मरणार्थ आज दिनांक १० ऑक्टोंबर २०२३ मंगळवार रोजी रात्री ठिक आठ वाजता भडगाव रोड पाचोरा येथील राजे संभाजी महाराज चौक येथे झी टॉकीज गजर भक्तीचा फेम सुप्रसिध्द युवा किर्तनकार ह. भ. प. शिवलिलाताई पाटील यांचे जाहीर किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी पाचोरा, भडगाव तालुक्यातील भाविकांनी या कीर्तन सोहळ्याचा मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन पाचोरा, भडगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार मा. श्री. दिलीप भाऊ वाघ व पाचोरा सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन राष्ट्रवादी काँग्रेस गटनेते मा. श्री. संजय वाघ तसेच समस्त वाघ परिवार राणीचे बांबरुड यांनी केलेला आहे. या कीर्तन सोहळ्याला लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्था यांचे मोलाचे सहकार्य लाभणार असून किर्तनाचा कार्यक्रम वेळेवर सुरु होणार आहे.
तरी सर्व किर्तन, भजन प्रेमींनी वेळेवर उपस्थित राहून या किर्तन सोहळ्याचा लाभ घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती माजी आमदार मा. श्री. दिलीप भाऊ वाघ, पी. टी. सी. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते मा. श्री. संजय वाघ व वाघ परिवारातर्फे करण्यात आले आहे.