अंबे वडगाव गावा,तांड्यात खुलेआम सट्टा बिटींग (त्रस्त महिलांनी सत्यजीत न्यूज कडे मांडली कैफियत ) अवैधधंदे करणारांकडून आंदोलन कर्त्यांना दमदाटी
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक=२०/११/२०२०
अंबे वडगाव गावपरिसरात सट्टा ,पत्ता, गावठी व देशीदारुची विक्री हे अवैधधंदे खुलेआम सुरु आहेत. या कारणांमुळे गाव व तांड्यात अशांतता पसरली असून व्यसनाधीन लोकांची बरीचशी कुटुंब बर्बाद होत असून काही बर्बादिच्या मार्गावर आहेत. तसेच घराघरात भांडणे होत असून महिलावर्ग त्रस्त झाला आहे.
या त्रासाला कंटाळून वैतागलेले ग्रामस्थ व महिलावर्गाने पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला व वरीष्ठ अधिकारी वर्ग तसेच तालुक्याचे आमदार ,मुख्यमंत्री, पालकमंत्री व इतर लोकप्रतिनिधींना अवैधधंदे बंद करण्यासाठी निवेदन दिले आहे.
व याचाच भाग म्हणून चरणसिंग महारु राठोड. हे येत्या २७ नोव्हेंबर शुक्रवारपासून पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनसमोर आमरण उपोषण बसणार आहे.म्हणून अवैधधंदे करणारांनी आंदोलन कर्त्यांना दमदाटी करून दडपण आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
याची दखल घेत वरिष्ठ अधिकारी व पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन यांनी धाडसत्र सुरु केले आहे. मात्र तरीही वरिल गावातील अवैधधंदे करणारे पोलिसांना जुमानत नसून अजुनही भरवस्तीत सट्टा , पत्ता, गावठी व देशीदारुची विक्री सुरुच असल्याने महिलावर्गाने सत्यजीत न्यूजला भेट देऊन संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या व काही चिठ्ठ्या दाखवून अद्यापही सट्टा बिटींग सुरू असल्याचे पटवून दिले.
जर येत्या २७ नोव्हेंबरपर्यंत गावातील अवैधधंदे बंद न झाल्यास तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला आहे.