पाचोरा येथील शाहीर विठ्ठल एकनाथ महाजन माऊली यांची जळगाव जिल्हा सदस्य पदी तर ॲडव्होकेट दिपक पाटील साहेब यांची तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती
दिलीप जैन.(पाचोरा)
दि.१२/११/२०२०
शासन मान्य ग्राहक कल्याण फाऊंडेशन च्या जिल्हा कार्यकारिणी सदस्य पदी पाचोरा येथील शाहीर विठ्ठल एकनाथ महाजन माऊली यांची तर पाचोरा तालुका अध्यक्ष पदी भाऊसो. अॅडव्होकेट दिपक विठ्ठल पाटील साहेब, यांची नियुक्ती जिल्हाअध्यक्ष- हेमंत दादा भांडारकर यांनी अमळनेर येथे झालेल्या बैठकीत नियुक्ती केली, बैठकीसः उपाअध्यक्ष- साहित्यिक अ.फ.भालेराव (मुक्ताईनगर),कार्याध्यक्ष- अशोक महाजन रावेर,सहकार्याध्यक्ष-अॅडव्होकेट कृतिका आफ्रे पारोळा,कार्य उपाध्यक्ष-पत्रकार कुंदनसिंह ठाकुर एरंडोल,कार्यवाह-प्रा.डाॅ.अविन्त पाटील जळगाव,सहकार्यवाह-पत्रकार कैलास महाजन एरंडोल,उप कार्यवाह-शितल जडे जळगाव,सचिव-अॅडव्होकेट जास्वंदी भंडारी भुसावळ,सहसचिव-सुनिल पाटील सावदा,कोषअध्यक्ष-रूपेश महाजन अडावद,सहकोषअध्यक्ष-केदारनाथ पाटील चोपडा,सदस्य-प्रा.सुरेश कोळी भडगाव,सदस्य-मनोज महाजन पिंपळी,सदस्य-भैय्यासाहेब निर्मलकुमार भालेराव मुक्ताईनगर,सदस्य-प्रा.वासुदेव पाटील जळगाव,जिल्हा कार्यालय प्रमुख- ॲडव्होकेट कुंदन साळुंखे अमळनेर, पदाधिकारी व कार्यकरते बहुजन समाज मंडळी उपस्थित होते,
शाहिर माऊली विठ्ठल महाजन यांच्या या स्तुत्य निवडीबद्दल महाराष्ट्र शासनाच्या राज्य ग्राहक संरक्षण परिषदेवरील अशासकिय सदस्य विकास महाजन ( जळगाव ),संघटनेचे प्रदेश तुकाराम महाराज निंबाळकर,प्रदेश उपाध्यक्ष रामचंद्र तांबे ,प्रदेश कार्यवाह सतीष साकोरे,डॉ.प्रविण माळी (पाचोरा) आदींनी अभिनंदन केलेले आहे.