खडकदेवळा येथील शेतकरी युवकाचा सर्पदंशाने मृत्यू पाचोरा

दिलीप जैन.(पाचोरा)
खडकदेवळा येथील शेतकरी युवकाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना घडली. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, खडकदेवळा ता. पाचोरा येथील युवा शेतकरी देवानंद लालचंद तेली (वय – २३) हे आज सकाळी आई सोबत शेतात गिल्के तोडण्यासाठी गेले होते. दरम्यान दुपारी ३ वाजेच्या सुमारास देवानंद तेली यास उजव्या पायाच्या टाचेजवळ विषारी सर्पाने दंश केला. शेजारीच आई गिल्के तोडत असतांना देवानंद ने पायाला काहीतरी चावल्याचे सांगितले असता आईने आरडा ओरड करुन शेजारील शेतात काम करीत असलेल्या युवकांना बोलावुन देवानंद यास तात्काळ पाचोरा ग्रामिण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता येथील डॉ. अमित साळुंखे यांनी त्यास मृत घोषित केले. व याबाबत पाचोरा पोलिसांत खबर दिल्यावरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असुन घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक सचिन निकम हे करीत आहे. मयत देवानंद याचे पाश्र्चात्य आई, एक लहान भाऊ, तीन विवाहित बहीणी असा परिवार असुन देवानंद हा अतिशय होतकरु, मनमिळाऊ व परिवारातील कर्ता पुरुष होता. देवानंद याचे अकस्मात मृत्यूने खडकदेवळा परिसरात शोककळा पसरली आहे.