सावखेडा ते भोजे रस्त्यावर जीवघेणा खड्डा, अपघाताची मालिका सुरुच.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/०६/२०२१
पाचोरा तालुक्यातील सावखेडा ते भोजे गावा दरम्यान सावखेडा गावापासून पासून जवळच असलेल्या मुंजोबा बाबा मंदिराचे जवळ असलेल्या नाल्याच्या पुलाच्या फरशीवर बऱ्याच दिवसापासून मध्यभागी मोठा खड्डा पडलेला असून हा खड्डा बुजवण्यासाठी संबंधित विभागाला वारंवार सांगूनही खड्डा बुजवला जात नसल्याने या रस्त्यावरून जातांना या खड्ड्यांमुळे आजपर्यंत बरेच अपघात झाले आहेत. हा खड्डा असाच राहिल्यास एखाद्यावेळी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विशेष म्हणजे रात्री-बेरात्री या रस्त्यावरून जातांना हा खड्डा दिसून येते नसल्याने या खड्ड्यात पडून बरेचसे अपघात झाले आहेत. या रस्त्यावर असलेला खड्डा लक्षात यावा म्हणून काही तरुणांनी खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून एक प्रकारे निषेध व्यक्त केला आहे. तरी हा खड्डा त्वरित भरण्यात यावा अशी मागणी वरखेडी, सावखेडा, भोजे, चिंचपूरे, पिंपळगाव हरेश्वर ग्रामस्थांनी केली आहे.