पिंपळगाव हरेश्वर येथील बलात्कारी आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांनी आवळल्या मुसक्या.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२९/०८/२०२१
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला दिनांक २७ ऑगस्ट शुक्रवार रोजी रात्री ०८ वाजून ०८ मिनिटांचे सुमारास भाग ५ गुन्हा रजिस्टर नंबर २३६/२०२१ भा.द.वी क. ३७६(३), ३७६(२)(जे), ३५४(१), ५०४, ४, ३६३ पोस्को प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यापासून या गुन्हयातील आरोपी नामे धरम मोइद्दीन तडवी वय वर्षे (३१) हा जामनेर तालुक्यातील नवी हा फरारा झाला होता.
या गुन्ह्यातील निष्पन आरोपी धरम मोइद्दीन तडवी हा फत्तेपुर येथील गोदरी तांडा येथील एका शेतात आला असल्याची गुप्त माहिती पोलिसांना त्यांच्या खबऱ्याकडून मिळाली होती.या माहितीच्या आधारे जिल्हा पोलिस अधिक्षक मा.श्री. प्रविणजी मुंडे साहेब, अप्पर पोलीस अधिक्षक मा.श्री.चंद्रकांत गवळी साहेब, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक मा.श्री.किरणकुमार बकाले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक फौजदार मा.श्री.अशोक महाजन,पोलिस नाईक किशोर राठोड, रणजित जाधव, कृष्णा देशमुख,विनोद पाटील, असे पथक आरोपीला पकडण्यासाठी पाठवण्यात आले होते.
या पथकाने लागलीच फत्तेपुर येथून जवळच असलेल्या गोदरी तांडा शिवारातील एका शेतात लपून बसलेला आरोपी धरम मोइद्दिन तडवी यास दिनांक २८ ऑगस्ट शनिवारी शिताफीने ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी करून कायदेशीर रीत्या पिंपळगाव हरेश्वर पोलिसांच्या ताब्यात दिले असून पुढील तपास व कारवाई पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला नव्यानेच हजर झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.श्री. कृष्णा भोये व त्याचे सहकारी करत आहेत.
ही घटना घडल्यापासून पंचक्रोशीतील जनतेतून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून आरोपीला कडक शासन व्हावे अशी मागणी केली जात आहे.