ऊस तोडणीसाठी मजूर गेल्याने, मजूरांचा तुटवडा.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०४/११/२०२१
पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव तांडा नंबर एक व तांडा नंबर दोन, कोकडी तांडा, वडगाव जोगे, कुऱ्हाड तांडा, लाख तांडा, वरसाडे तांडा, जामनेर तालुक्यातील मालखेडा येथील बंजारा समाजबांधव तसेच तडवी बांधव ऊसतोडणी करीता बाहेरगावी गेल्याने आता वरील गावागावात मजूरांचा तुटवडा निर्माण झाला असून आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पुढे कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याने मजूरा अभावी कापूस वेचणीसाठी विलंब होत आहे.
तर दुसरीकडे याचाच फायदा घेत मजूरांची संख्या कमी असल्याने कापूस वेचणीसाठी मजूर आता दहा ते बारा रुपये प्रतिकिलो प्रमाणे वेचणीची मजूरी घेत असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक झळ बसत आहे.
तसेच कापसाला चांगला भाव मिळत असला तरी यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले असून उत्पन्नात मोठी घट झाली असल्याचे शेतकरी वर्गाकडून सांगितले जात आहे.