भेट एका ध्येयवेड्याची.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/०१/२०२१
मी सहज जळगाव येथे गेलो होतो. मला माझे मित्र मृत्यू घरचा पहारा या पुस्तकाचे लेखक पो.ना.विनोद अहिरे यांची आठवण झाली. व मी सहज फोन करुन विचारपूस केली व मी जळगावला आलो आहे असे सांगितले व भेट होईल का असे विचारले
लगेचच विनोद अहिरे यांनी तुम्ही कोठे आहात ते सांगा तुम्ही दिव्यांग आहात त्रास होईल असे म्हणत मीच भेटायला येतो असे सांगितले.
व फक्त दहा मिनिटात ते माझ्या समोर उभे राहिले नंतर मी त्यांच्या तब्बेतीची विचारपूस करून सद्या काय लिहीत आहे हे विचारले
अश्याच गप्पा रंगल्या व मी एक प्रश्न विचारला की तुमच्या आयुष्याती असा एखादा चांगला प्रसंग सांगा की जो तुम्हाला अपेक्षित नसतांना अनुभवायला आला
त्यांनी लगेचच सुरुवात केली व तो आनंददायी प्रसंग सांगितला तो त्यांच्याच शब्दातून आपल्यासमोर ठेवत आहे.
*आश्चर्याचा सुखद धक्का*
दिनांक १६/०१/२०२१ सकाळी सहजच मा. गृहमंत्री श्री अनिल देशमुख साहेबांच्या अधिकृत फेसबुक वर गेलो तर बघतो तर काय! चक्क प्रोफाईल फोटो माझा होता. गृहमंत्री महोदयांनी माझ्या पाठीवर शाबासकीची थाप मारत असलेला फोटो त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर प्रोफाईल डीपी ठेवलेला होता. क्षणभर तर विश्वासच बसला नाही, दिनांक ऐक नोव्हेंबर २०२० रोजी अमळनेर येथे आलेल्या पोलीस वसाहतीच्या उद्घाटन प्रसंगी मा. पोलीस अधीक्षक सो.श्री प्रवीण मुंढे यांनी आम्हाला सन्माननीय गृह मंत्री महोदयांना, माझे “मृत्यू घराचा पहारा” हे पुस्तक भेट देण्याची संधी दिली होती. त्याच क्षणाला साहेबांनी पुस्तकाच्या मलपृष्टावरिल मजकूर वाचून माझ्या पाठीवर शाबासकीची थाप मारली होती. तोच फोटो त्यांच्या फेसबुक dp अपडेट करुन ठेवला आहे. रांज्याच्यागृहमंत्र्यांनीमाझ्या कर्तृत्वाचा सन्मान केल्याबद्दल खुप खुप धन्यवाद.या अगोदर सुध्दा साहेबांनी माझा फोटो ट्वीट केला होता. वरिष्ट पोलीस अधिकारी असो वा आमच्या सारखे सर्वसाधारण कर्मचारी असोत प्रत्येकाच्या उत्कृष्ट कामगिरीचे तेनेहमीच मुक्तकंठाने प्रशंसा करित असतात त्यांच्या या वैचारिक प्रगल्भतेलादेखील सॅलूट
पो.ना.विनोद अहिरे.