वरखेडी ते अंबे वडगाव रस्त्यावर बैलगाडा शर्यत, मोठ्या अपघाताची शक्यता कारवाईची मागणी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०३/१०/२०२३

पाचोरा ते जामनेर रस्त्यावर लोहारी ते मालखेडा दरम्यान रात्रीच्या वेळी बैलगाडा शर्यती घेतल्या जात असल्याने पाचोरा ते जामनेर रस्त्यावर लोहारी, वरखेडी, अंबे वडगाव ते मालखेडा या दरम्यान दररोज रात्री नऊ वाजेपासून तर रात्री अकरा वाजेपर्यंत २५ ते ३० बैलगाड्या व सोबतच मोटारसायकलवरून काही तरुण या बैलगाड्यांन सोबत भरधाव वेगाने आपापली वाहने पळवतात.

यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होऊन या रस्त्यावरुन येणाऱ्या, जाणाऱ्या ट्रक, टेम्पो, एस. टी. मोटारसायकल व कधी, कधी रुग्णवाहिकेतून रुग्ण नेतांना मोठा अडथळा निर्माण होतो. तसेच या भरधाव वेगाने धावणाऱ्या बैलगाड्या व सोबतच्या मोटारसायकल समोरुन येणाऱ्या वाहनांवर धडकून एखाद्यावेळी मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
——————————————————————
वरखेडी येथे भरतो अनाधिकृत बैल बाजार, कारवाईची मागणी.
——————————————————————

तसेच विशेष म्हणजे जळगाव जिल्ह्यात गोवंशाची जनावरांना लंम्पी या त्वचा रोगाची मोठ्या प्रमाणात लागण झाली असल्याने या आजाराचा प्रसार होऊ नये म्हणून शासनाने गोवंशीय गुराढोरांचे बाजारावर तसेच अनेक गुरेढोरे एकत्रित आणून वाहतूक करण्यावर बंदी घातली आहे. तरीही पाचोरा तालुक्यात बैलगाडा शर्यती घेतल्या जात आहेत. तसेच वरखेडी येथे गुरुवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात गोवंशीय जानावरे विक्री करण्यासाठी बंदी घातलेली असतांनाही काही व्यापारी वरखेडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची परवानगी नसतांनाही मार्केट यार्डा समोर अनधिकृतपणे गुरांचा बाजार भरवत असल्याने लंम्पी आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढु शकतो अशी भीती पशुवैद्यकीय अधिकारी यांनी व्यक्त केली आहे.
——————————————————————–

शासनाच्या आदेशाची पायमल्ली करत बैलगाडा शर्यती व वरखेडी येथे गुरुवारी भरणाऱ्या गुरांच्या बाजारावर कारवाईची मागणी केली जात आहे.

ब्रेकिंग बातम्या