लोहारा येथील तीन महिन्यापूर्वी बेपत्ता झालेल्या मुलीचा शोध लागत नसल्याने पिंपळगाव हरेश्वर पोलीसांच्या विरोधात आमरण उपोषणाला सुरुवात.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०३/१०/२०२३
लोहारा येथील तीन महिन्यापूर्वी बेपत्ता झालेल्या मुलीचा शोध लागत नसल्याने मुलीचे वडील सतीश बाबूलाल धनगर व सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. शांताराम बेलदार,(आण्णा बेलदार) यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीसांच्या कार्यप्रणालीवर संशय घेत काल दिनांक ०२ ऑक्टोंबर २०२३ सोमवार पासून पाचोरा प्रांताधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
उपोषणाला सुरुवात होताच याची दखल घेत पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. श्री. राहुलजी खताळ साहेबांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांचे मत जाणून घेतले व मी वरिष्ठांना आपल्या भावना कळवतो असे आश्वासन दिले आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.