खासदार उन्मेष दादा पाटील यांनी दिले पथदिवे, मात्र ठेकेदाराने उभे केले झुलते मनोरे २८ लाखाचा निधी पाण्यात.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०८/११/२०२३

पाचोरा तालुक्यातील वडगाव आंबे येथे खासदार उन्मेष दादा पाटील यांनी पथदिव्यांसाठी २८ लाख रुपयाचा निधी उपलब्ध करुन दिला होता. या निधीतून वडगाव आंबे बसस्थानक परिसरा परिसरापासून ते गावाजवळच असलेल्या वरखेडी रस्त्यावरील श्री. पारिमांडल्य महानुभाव आश्रमापर्यंत पथदिवे बसवण्यासाठी एका ठेकेदाराला काम देण्यात आले आहे.

परंतु संबंधित ठेकेदाराने या पथदिव्यांसाठी खांबांची उभारणी करतांना जामनेर ते पाचोरा या अत्यंत रहदारीच्या रस्त्यावर डांबरीकरणापासून अवघ्या दोन ते तीन फुटावर सिमेंटचे स्थंभ बनवून त्यात नट, बोल्ट फिट करत त्याठिकाणी पथदिव्यांसाठी खांब उभारले आहेत. मात्र कॉंक्रिटीकरण करतांना सिमेंट अत्यंत कमी प्रमाणात वापरल्याने पतदिव्यासाठी उभारण्यात आलेले खांब झुलत्या मनोरा सारखे डगमग हलत आहेत. तसेच या पथदिव्यांसाठी विद्युत पुरवठा करणारी विद्युत वाहिनी (केबल वायर) टाकतांना ती जमिनीत तीन फुटांपेक्षा जास्त खोल न टाकता फक्त अर्धा फुट खोल चारी खोदुन वरच्यावर टाकण्यात आली आहे.

महत्वाचे म्हणजे हे पथदिव्यांसाठी उभारण्यात आलेले खांब सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत व डांबरीकरणापासून दोन ते तीन फुटावर उभारण्यात आल्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होऊन अपघाची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच या रस्त्याचे लवकरच रुंदीकरण करण्यात येणार असल्याने रुंदीकरण करतांना हे पथदिव्यांसाठी उभारण्यात आलेले खांब नक्कीच काढले जातील यात शंका नाही म्हणून या गैरप्रकाराकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष देऊन हे रहदारीला अडथळा ठरणारे पथदिव्यांचे खांब त्वरित काढण्यासाठी कारवाई करावी अन्यथा होणाऱ्या दुष्परिणामांना सार्वजनिक बांधकाम विभाग पाचोरा यांना जबाबदार धरण्यात येईल असा इशारा वडगाव आंबे गावातील सुज्ञ नागरिकांनी दिला आहे. तसेच खासदार उन्मेष दादा पाटील यांनी दिलेला २८ लाखांचा निधी पाण्यात जाण्यार असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

ब्रेकिंग बातम्या