पाचोरा शहर व तालुक्यातील वेब डिजिटल मिडीयाचे संपादक व प्रतिनिधींची बैठक संपन्न.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/१०/२०२३
काल दिनांक ०१ ऑक्टोंबर २०२३ रविवार रोजी पाचोरा शहर व तालुक्यातील वेब व डिजिटल मिडीयाचे संपादक व प्रतिनिधींची बैठक बहुळा धरणा जवळील कृष्णा सागर येथे खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. या बैठकीत वेब डिजिटल मिडीयाचे वाढते प्रस्थ व संपादक व प्रतिनिधींना येणाऱ्या अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात येऊन आगामी काळात विविध उपक्रम राबवण्यासाठी काय उपाययोजना व करायच्या याबाबत सर्वांची मते जाणून घेत आगामी काळात कोणते उपक्रम राबविले जाणार आहेत याबाबत अजयकुमार जैस्वाल यांनी सविस्तर माहिती देत हे सर्व उपक्रम व विषयाला सर्वानुमते संमती देत उपक्रम राबवण्यासाठी वेब डिजिटल मीडियाची ध्येय, धोरणं ठरवण्यात आली.
या बैठकीला झेप इंडियाचे संपादक मा. श्री. योगेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कालच त्यांचा वाढदिवस असल्याने सर्व संपादन व पत्रकार बांधवांनी त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने भरभरुन शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांनी वेब डिजिटल मिडीयाला संपूर्ण सहकार्य मिळेल अशी भावना व्यक्त केली. तसेच मी कोणत्याही संघटनेचा सभासद नसलो तरी मी प्रत्येक संघटनेच्या पत्रकारांसाठी योग्य ती मदत किंवा कोणत्याही पत्रकारावर अन्याय झाल्यास संबंधित पत्रकाराची भुमिका योग्य असेल तर मी सदैव सोबत राहील अशी ग्वाही दिलीप जैन यांनी दिली.
या बैठकीला जे. बी. एन. महाराष्ट्रचे ईश्वरभाऊ चोरडिया, सत्यजित न्यूजचे दिलीप जैन, आर, व्हि, आर न्यूजचे रविशंकर पांडे, दिशा न्यूजचे दिनेश चौधरी, ट्रेन लायू न्यूजचे दिलीप पाटील, आरोग्य दुतचे नरसिंह भुरे, ट्रेन लायू न्यूजचे दिलीप पाटील, ग्राम महाराष्ट्रचे न्यूजचे निलेश पाटील, जनलक्ष न्यूजचे प्रमोद बारी, साक्षी न्यूजच्या कु. चंचल सोनवणे व गौरी सोनवणे, दिपलक्ष्य न्यूजचे दिपक मुलंमुली, सी एन आय महाराष्ट्र न्यूजचे छोटुभाऊ सोनवणे, लोकनायक न्यूजचे सचिन चौधरी, चंदुभाऊ खरे, अतुल माळी, गजानन शिरसागर, स्वप्नील कुमावत इत्यादी संपादक मंडळी हजर होते.
तसेच पिबीसी मातृभूमीचे प्रविण भाऊ ब्राम्हणे, आर. के. न्यूजचे संपादक राजुभाऊ धनराळे, केसरीराज लायूचे प्रमोद पाटील, रत्नप्रभा न्यूजचे अमोल झेरवाल, झुम मराठीचे दिलीप परदेशी, जनलक्षचे संदिप मराठे, तालुका माझा न्यूजचे बंडु भाऊ सोनार ही संपादक मंडळी कामानिमित्त बाहेरगावी असल्याने त्यांनी भ्रमणध्वनीवर संपर्क साधुन संघटनेला पाठिंबा दर्शवला आहे.
पत्रकारांच्या बैठकीचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते अजयजी जैस्वाल यांनी केले होते. या बैठकीच्या यशस्वीतेसाठी सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जैन यांनी अथक परिश्रम घेतले तर संजय पाटील यांनी आतोजकांचे व उपस्थित संपादकांचे आभार मानले.