पाचोरा तालुक्यात होत असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उमेदवारांच्या घोषणापत्रात लपवाछपवी, ग्रामविस्तार अधिकाधिक व जबाबदार अधिकाऱ्यांचा छुपा पाठिंबा.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/१०/२०२३
[हम भी नकटे तुम भी नकटे सब नकटो का मेला है,
एक कोई अलबेला था वो (शासकीय अधिकारी) आज हमारा चेला है.]
पाचोरा तालुक्यातील काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून या ग्रामपंचायतीवर जानेवारी २०२३ पासून प्रशासकीय राजवट लागू आहे. आता नुकताच निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणूकीसाठी १६ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर पर्यंत नामांकन पत्र दाखल करण्यात आली असून २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजेपासून प्र. अ. छाननी पूर्ण झाली आहे. तसेच २५ ऑक्टोंबर दुपारी तीन वाजेपर्यंत माघार घेण्यासाठीची वेळ मर्यादा आहे. यानंतर लगेचच म्हणजे त्याच दिवशी २५ ऑक्टोंबर दुपारी तीन वाजेपासून निवडणूक चिन्हाचे वाटप व अंतिम निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. व ५ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात वाजेपासून ते साडेपाच वाजेपर्यंत मतदान, सहा नोव्हेंबर रोजी मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात येणार आहेत. तसेच दिनांक २५ ऑक्टोंबर बुधवार रोजी माघारीची तारीख असल्याकारणाने उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या भावी उमेदवारांना लाखमोलाची किंमत आली असून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी एकमेकांची मनधरणी केली जात आहे.
असे असले तरी मात्र ज्या, ज्या गावच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत त्या, त्या गावातून उमेदवारी अर्ज दाखल करतांना शासनाने व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या नियमानुसार उमेदवारी अर्ज दाखल करतांना घोषणापत्रात माहिती देतांना मात्र कायदा खिशात ठेवून मोठ्या प्रमाणात काळे, गोरे करुन सत्य परिस्थिती लपवून घोषणापत्र देण्यात आले असल्याचे खात्रीलायक वृत्त असून सुज्ञ नागरिक व जनमानसातून नाराजी व्यक्त केली जात आहे.
यात महात्वाचा मुद्दा म्हणजे शासकीय जागेवर ज्याचे स्वताहाचे किंवा नातेवाईकांनी अतिक्रमण केलेले असेल अश्या अतिक्रमण धारकांना उमेदवारी अर्ज दाखल करता येत नाही असा नियम असल्यावरही संबंधितांनी उमेदवारांनी ग्रामसेवक व तत्सम अधिकाऱ्यांना हाताशी धरुन ग्रामपंचायत निवडणूकीत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत त्यापैकी बऱ्याचश्या अर्जदारांनी स्वताहून तसेच त्यांच्या नातेवाईकांनी गावात, गावठाण व शासकीय भूखंडावर अतिक्रमण केलेले असल्यावरही ग्रामपंचायत क्षेत्रातील सरकारी जमिनीवर स्वताहा केलेल्या तसेच कुटुंबातील व्यक्तीने केलेल्या अतिक्रमणाची माहिती लपवून ठेवत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम १४ ज – ३ चे उल्लंघन केले असल्याचे दिसून येते आहे.
या गैरप्रकाराची चौकशी होऊन वरील अतिक्रमण केलेल्या संबंधित उमेवारी दाखल करतांना खोटी माहिती देणाऱ्या उमेदवारांवर व ही खोटी माहिती असल्यावरही दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित ग्रामपंचायतीवर कार्यरत असलेले ग्रामसेवक व तत्सम जबाबदार अधिकारी यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून, दोषी असलेल्या सर्व घटकांवर तात्काळ कारवाई करण्याची गरज असल्याचे मत सुज्ञ नागरिकांनी व्यक्त करत अश्या झुंडशाहीला त्वरित पायबंद घालण्यासाठी त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे.