दिनांक १२ सप्टेंबर पासून महाराष्ट्र राज्य अनुदानित वस्तीगृह कर्मचारी संघटनेचे जेलभरो आंदोलन.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/०८/२०२४
दिनांक १२ सप्टेंबर पासून महाराष्ट्र राज्य अनुदानित वस्तीगृह कर्मचारी संघटनेचे जेलभरो आंदोलन भिवंडी बायपास ठाणे येथून होणार असून सर्व कर्मचारी वर्गाने सर्व मतभेद व गट तट बाजूला ठेवून एकसंघतेने जेलभरो आंदोलनात सहभागी व्हावे अशी विनंती कर्मचारी संघटने मार्फत करण्यात आली आहे.
या आंदोलनाबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता राज्यात एकूण २३८८ वसतिगृहे असून सर्व वसतिगृह ही अनुदानित असून १००% अनुदान प्राप्त करत आहेत. तरीही वस्तीगृह कर्मचाऱ्यांना मात्र अजूनही तुटपुंजे मानधन दिले जात असल्यामुळे आजच्या महागाईच्या काळात मुलाबाळांच्या शिक्षणासाठी लागणारा खर्च, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी तसेच दवाखाना व इतर समस्या सोडविण्यासाठी लागणारा खर्च पहाता आज वस्तीगृह कर्मचाऱ्यांना संसार चालवतांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.
एका बाजूला आजच्या परिस्थितीत वस्तीगृह अधिक्षक १००००/०० रुपये, स्वयंपाकी ८५००/०० रुपये , मदतनीस ७५००/०० रुपये, चौकीदार ७५००/०० रुपये असे तुटपुंजे मानधन दिले जाते तर दुसरीकडे राज्यशासनचे वस्तीगृह, आश्रम शाळा व संलग्न असलेली वस्तीगृहाचे कर्मचारी तसेच आदिवासी विकास विभागातील आश्रम शाळा व वस्तीगृहाचे कर्मचारी हे सामाजिक न्याय विभागा अंतर्गत येत असल्याने त्यांना वेतन दिले जाते हा दुजा भाव करण्याची शासनाची ही भूमिका असल्याचे दिसून येत असून शासनाला जागे करण्यासाठी आम्ही येत्या १२ सप्टेंबर २०२३ पासून जेलभरो आंदोलनात करणार असल्याचे जाहीर केले आहे.
तरी वस्तीगृहाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी आपसातील मतभेद बाजूला ठेवून या जेलभरो आंदोलनात सहभागी व्हावे अशी विनंती व आवाहन अनुदानित वस्तीगृह कर्मचारी संघटनेतर्फे करण्यात आले आहे.