प्रत्येक शाळा, कॉलेजमध्ये (तिसरा डोळा) सी. सी. टी. व्ही. कॅमरे बसवण्यात यावेत. दिलीप जैन.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१०/०८/२०२३
सद्यस्थितीत आपल्या देशात सगळीकडे महिलांवर होणारे अत्याचार, महिला, मुलींचे अपहरण, महिला मुलींना पळवून नेणे त्यांच्यावर अत्याचार करुन जिवे ठार मारणे बेसहारा महिला, मुलींची विक्री करणे, अवयव विक्री करणे अशा गंभीर घटना घडत आहेत. यात आता शैक्षणिक क्षेत्रातही अशा घटना घडत आहेत. शाळा, कॉलेज सुरु असतांना वर्गात, शाळेच्या ग्राऊंडवर, जिन्यावर, शाळा, कॉलेजमध्ये येण्या, जाण्यासाठीच्या रस्त्यावर, प्रवासात किंवा दैनंदिन कामानिमित्त बाहेर येणाऱ्या महिला व मुलींना त्रास देत टवाळखोर मुले तसेच काही वयस्कर विकृत पुरुष महिला व मुलींची छेडखानी करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.
असेच गैरप्रकार शाळा, कॉलेजमध्ये मोठ्या प्रमाणात घडत असून या गैरप्रकारात विद्यार्थी, शाळाबाह्य टवाळखोर मुले, तरुण मुले व काही विकृत वयस्करांची भर पडली असून यात आता शाळा, कॉलेजमध्ये जे विद्यादानाचे पवित्र कार्य करतात असे (सगळेच नाही) काही विकृत शिक्षकही मागे राहिलेले नाहीत. याचेच जिवंत उदाहरण म्हणजे जळगाव जिल्ह्यातील एका शाळेत विद्यार्थिनीच्या गणवेशाचे माप घेण्याच्या बहाण्याने एका शिक्षकाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे.
यामागील एकमेव कारण म्हणजे आता शिक्षणाचे खाजगीकरण व बाजारीकरण झाल्यापासून बऱ्याचशा शैक्षणिक संस्थांनी मोठमोठ्या अलिशान इमारती बांधल्या आहेत. या इमारतीमध्ये मोठमोठ्या वर्गखोल्या, मोठमोठे स्टोअर रूम, तीन तीन मजली इमारती असल्याकारणाने जीने याठिकाणी मुलींना एकटे गाठून छेडखानी, अडवणूक करणे तसेच शाळेत अँड्रॉइड मोबाइलचा सर्रास वापर होत असल्याने संमती नसतांना एकमेकांना संदेश टाकून हैराण करणे किंवा कळत, नकळत फोटो काढून त्यावर गाणे टाकून त्याचा गैरफायदा घेणे हे प्रकार वाढत चालले या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आता प्रत्येक शाळा, कॉलेजमध्ये वर्गखोलीत, जिन्यावर, स्टोअर रुम, लायब्ररीत व ग्राऊंडवर सी. सी. टी. व्ही. कॅमेरे बसवने अनिवार्य झाले आहे असे मत शाळा, कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलींनी व सुज्ञ नागरिकांनी सत्यजित न्यूज कडे व्यक्त करत चिंता व्यक्त केली आहे.
म्हणून शाळा, कॉलेजमध्ये सी. सी. टी. व्ही. कॅमेरे बसविण्यात यावेत, विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या मोबाईल वापरावर बंदी घालण्यात यावी याकरिता अंबे वडगाव येथील रहिवासी दिलीप जैन हे काही समाजसेवी सामाजिक संघटनांना सोबत घेऊन लवकरच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथरावजी शिंदे साहेब, आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील, मा. शिक्षणमंत्री, मा. जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करणार आहे.