भोकरी येथील आक्सा नगर परिसरातील प्लॉट धारकांची फसवणूक, संबंधित मालकावर लवकरच गुन्हा दाखल होण्याची शक्यता.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/०७/२०२२
वाढती लोकसंख्या तसेच विभक्त कुटुंब पद्धतीमुळे सद्यस्थितीत प्रत्येकाला स्वताच घर पाहिजे म्हणून सगळीकडे मोठ्या प्रमाणात घरांची व घर बांधण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने घरांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. याच संधीच सोन करण्यासाठी काही सधन लोकांनी गावागावांतील वस्तीजवळ असलेल्या शेत जमीनी विकात घेऊन काही ठिकाणी शासनाच्या नियमाप्रमाणे तर काही ठिकाणी शासनाचे नियम धाब्यावर बसवून शासकीय कार्यालयातील कागदावर वजन ठेवून शेत जमीनीची बिगरशेतीत नोंद करुन त्या जमिनीवर प्लॉट पाडून त्या प्लॉटची मोठ्या प्रमाणात विक्री करुन रग्गड पैसा कमावण्यासाठी गोरखधंदा सुरु केला आहे.
बाजारात किंवा जनसामान्यांच्या मागणीनुसार काय गरजेचे आहे व सद्यस्थितीत काय विकलं जाईल ही संधी साधून व्यवसाय करणाराच खरा यशस्वी उद्योजक बनतो. परंतु कोणत्याही व्यवसायात लबडी, फसवणूक करणे हे नियमानुसार चुकीचे आहे. तरीही आजच्या परिस्थितीत जळगाव जिल्ह्यात व खेड्यापाड्यात फ्लॅटच्या व्यवसायात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार सुरु असून हजारो गरजू प्लॅट धारकांची फसवणूक झाली असल्याचे उघडकीस येत आहे. असाच काहीसा प्रकार पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथून जवळच असलेले भोकरी गावात घडला असून पाचोरा येथील एका प्लॅटींगच्या व्यवसायीकाने जवळपास १६० गरजू प्लॅट धारकांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की वरखेडी येथून जवळच असलेले भोकरी हे गाव संपूर्ण मुस्लिम समाज बांधवांच्या वस्तीचे गाव असून या गावाच्या जवळच कुऱ्हाड रस्त्यालगत तसेच पी. डी. बडोला माध्यमिक विद्यालय ते पी. जे. रेल्वे फाटका दरम्यान पाचोरा येथील एका इसमाने शेत जमीन विकत घेऊन त्या शेतजमीचे बिगरशेतीत रुपांतर करुन त्या ठिकाणी जवळपास १६० प्लॅट टाकुन भोकरी ग्रामस्थांच्या गरजेचा गैरफायदा घेत या परिसरातील प्लॅट विक्री करतांना रस्ते, सांडपाण्याच्या गटारी, पथदिवे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असे वेगवेगळे आश्वासन देत फ्लॅटची संपूर्ण किंमत घेऊन प्लॅट विक्री केली आहे.
परंतु हे प्लॅट विक्री झाल्यापासून या व्यवसायीकाने ठरलेल्या करारानुसार व शासनाच्या नियमानुसार या प्लॅटींग केलेल्या भागात आजपावेतो रस्ते, गटारी, सार्वजनिक शौचालये, विद्युत पुरवठा या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नसून ओपन प्लेस जागेवर बगीचा किंवा इतर सजावट न करता ओपन प्लेस जागाही विकून टाकली असल्याने या भागात प्लॅट खरेदी करणाऱ्या गोरगरीब, सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होत आहे. याबाबत संबंधित मालकाकडे वारंवार मागणी करूनही तो कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध करून देत नसल्याने आपली फसवणूक झाली असल्याचे येथील रहिवासी सांगत असून ते लवकरच संबंधित इसमाविरोधात ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल करणार असलेले समजते.