भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल यांच्या विरोधात शासकीय कर्मच्याऱ्याला मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०१/०९/२०२२
कृषी पर्यवेक्षक अधिकाऱ्याला मारहाण व शिवीगाळ करत शासकीय कामात अडथळा आणला म्हणून भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल, यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
याबाबत सविस्तर जाणून घेतली असता जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील गोविंद कोटेक्स जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी संचालक तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष व त्यांच्या दोघ मुलांवर मारहाण व शिवीगाळ तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की फिर्यादी कन्हैया प्रकाश महाजन वय (३८) राहणार जामनेर धंदा नोकरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तालुका कृषी अधिकारी जामनेर त्यांच्याकडील आदेश जावक क्रमांक (तालुका कृषी)/तंत्र जिनिंग तपासणी/आदेश १४१४/२०२२ जामनेर २९/८/२०२२ अन्वये जामनेर तालुक्यातील जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीला भेटी देऊन आदेशाचे पालन करण्यासाठी शेंदुर्णी येथील गोविंद कोटेक्सच्या जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीत तपासणीसाठी आलो आहे.
तुम्ही सी.एस.आर. फंडातून फेरोमन ट्रॅप (साबळे) घेऊन ते बसविले आहेत का ? याबाबत मला पाहून खात्री करायची आहे व तसा अहवाल कार्यालयात सादर करायच्या असल्याने तुम्ही मला तुमच्या जिनिंग मध्ये लावलेले फेरोमेन ट्रॅप दाखवा असे त्यांना समजावून सांगितले असता यावर त्यांना राग येऊन अंगावर धावून आले व मला तिघांनी शिवीगाळ करून चापटा बुक्क्यांनी मारहाण करण्यात सुरुवात केली याबाबत फोन करून व प्रत्यक्ष जामनेर येथील कृषी कार्यालयात जाऊन तालुका कृषी अधिकारी अभिमन्यू चोपडे मंडल अधिकारी नीता घारगे लिपिक अश्विन अहिरे तंत्र सहाय्यक सुनील गायकवाड हे सर्व हजर असताना त्यांनाही सविस्तर माहिती दिली.
याबाबत कृषी सहाय्यक प्रवेक्षक कन्हैया प्रकाश महाजन यांच्या फिर्यादीवरून पहूर पोलीस ठाण्यात वैद्यकीय तपासणी नंतर शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून गोविंद कोटेक्स फॅक्टरीचे संचालक नितीन अग्रवाल निलेश अग्रवाल गोविंद अग्रवाल यांच्या विरोधात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३२७/२२ नुसार भारतीय दंड संहिता १८६० भादवि कलम ३५३/३३२/५०४/५०६ ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील हे करीत आहेत.
महिला राज नावाला अन पतीराज छळतात गावाला. शेंदुर्णी येथे उपनगराध्यक्षांच्या पतीविरुध्द गुन्हा दाखल.
या अगोदरही संबंधित व्यक्तीने एका सफाई कामगारांला असाच त्रास दिला होता अशी माहिती समोर येत असून संबंधित व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्रातील सर्व कृषी अधिकारी, कर्मचारी व सर्वसामान्य जनतेतून केली जात असून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे.