दिव्यांगांच्या सहाय्यक साहित्य खरेदी खर्चाच्या तरतूदी मध्ये वाढ, आ. किशोर आप्पा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/०३/२०२३
पाचोरा व भडगाव तालुक्यातील दिव्यांगांना जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन दिव्यांग पुनर्वसन केंद्रात पुनर्वसन केंद्राच्या तज्ञांकडून तपासणी करणे शारीरिक दृष्ट्या त्रासदायक व खर्चिक बाब असल्याचे लक्षात येताच पाचोरा, भडगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांनी पाचोरा व भडगाव तालुक्यातील दिव्यांग बांधवांना आवश्यक सहाय्यक साहित्य उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा रुग्णालय जळगाव व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या तज्ज्ञांमार्फत पाचोरा व भडगाव येथे स्वतंत्रपणे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात दिव्यांगांना गरजेप्रमाणे तीन चाकी सायकल, व्हिल चेअर, कृत्रिम अंग (अवयव) उपकरणे व इतर अत्यावश्यक साहित्य मिळवून देण्यासाठी या तपासणीत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या शिबिरात भडगाव व पाचोरा तालुक्यातील दिव्यांग लाभार्थ्यांची संख्या व आवश्यकतेनुसार लागणाऱ्या सहाय्यक साहित्याचे वाटप याची संख्या पहाता शासनाने निर्धारित केलेली दहा लाख रुपये खर्चाची मर्यादा याचा ताळमेळ बसत नसल्याने बरेचसे दिव्यांग बांधवांना या सवलती पासून वंचित राहावे लागणार होते.
यामुळे काही दिव्यांग बांधवांवर अन्याय होऊ नये व सर्व दिव्यांग बांधवांना या सवलतीचा लाभ घेता यावा म्हणून पाचोरा, भडगावचे लोकप्रिय आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांनी मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे दहा लाख रुपये निधी कमी पडत असल्याचे लक्षात आणून देत शासनाने निर्धारित केलेल्या कमाल खर्च मर्यादेत त्वरित वाढ करुन तीस लाख रुपयांपर्यंत खर्च वाढ करण्यात यावी याकरिता आग्रही मागणी लाऊन धरली होती.
ही मागणी लक्षात घेऊन मा. मुख्यमंत्री व मा. उपमुख्यमंत्री यांनी त्वरित सुचना देऊन दहा लाख रुपये कमाल खर्च मर्यादे ऐवजी तीस लाख रुपये खर्च मर्यादा निश्चित करत शासन निर्णय निर्गमित केल्याने महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांना याचा लाभ मिळणार असल्याने आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांनी दिव्यांग बांधवांच्या भावना व अडीअडचणी जाणून घेत वाढीव निधी उपलब्ध करून दिल्यामुळे दिव्यांगांना योग्य ते साहित्य खरेदी करणे सोयीचे झाले असल्याने मा. मुख्यमंत्री या. उपमुख्यमंत्री व आमदार किशोर आप्पा पाटील यांचे दिव्यांग बांधवांनी आभार मानले आहेत.
(पाचोरा तालुक्यातील दिव्यांगांना मिळणार लवकरच सहाय्यक साहित्य.)
आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांनी दिव्यांग व्यक्तींसाठी आयोजित केलेल्या आवश्यक सहाय्यक साहित्य तपासणी शिबिरात नोंदणी केलेल्या भडगाव तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना सुमारे १० लक्ष रुपयांच्या साहित्याचे यापूर्वीच वाटप झाले असून आता लवकरच पाचोरा तालुक्यातील तपासणी शिबिरात नोंदणी केलेल्या दिव्यांग बांधवांना सहाय्यक साहित्यांचे वाटप लवकरच होणार असल्याची माहिती आमदार किशोर अप्पा पाटील यांचे वतीने स्वीय सहाय्यक राजेश पाटील यांनी दिली आहे.