तात्यासाहेब स्व. आर. ओ. पाटील यांच्या आठवणीत जनसमुदाय गहिवरला.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/०३/२०२४
पाचोरा, भडगाव तालुक्याचे माजी आमदार तथा निर्मल उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष जनतेच्या मनामनात आदराचे स्थान निर्माण करुन आपल्यातून अचानकपणे निघून गेलेले दिगवंत लोकनेते तात्यासाहेब स्व. आर. ओ. पाटील यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्ताने आज सकाळी नऊ वाजेपासून ते अकरा वाजेपर्यंतच्या कालावधीत पाचोरा येथील निर्मल सीडस कंपनीच्या परिसरात उभारण्यात आलेल्या तात्यासाहेब स्व. आर. ओ. पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्याजवळ निर्मल सीडसच्या संचालीका, निर्मल स्कूलच्या अध्यक्षा तसेच उध्दव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या जेष्ठ नेत्या सौ. वैशालीताई सुर्यवंशी व मा. श्री. नरेद्रसिंग सुर्यवंशी यांनी निर्मल परिवारातील प्रमुख मान्यवर तसेच तात्यासाहेब स्व. आर. ओ. पाटील यांच्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन करत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली तसेच तात्यासाहेबांच्या जीवन कार्याचे स्मरण करत पाचोरा, भडगाव तालुक्यातील हजारो महिला व पुरुषांनी स्व. तात्या साहेबांना पुष्पांजली अर्पण करत अभिवादन केले या प्रसंगी उपस्थितीतांच्या डोळे पाणावले होते.
तात्यासाहेब स्व. आर. ओ. पाटील यांनी समाजसेवेचा वसा हाती घेऊन राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात स्वताला झोकून देत समाजहितासाठी भरीव कामगिरी केली तसेच आपण या महाराष्ट्राचे भूमिपुत्र आहोत याची जाण ठेवून त्यांनी शेतकऱ्यांचा विकास कसा साधला जाईल याचा विचार करुन निर्मल उद्योग समूहाच्या माध्यमातून कृषी व उद्योग क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान आणून पाचोरा, भडगाव तालुक्याचे नाव जगाच्या नकाशावर कोरले सोबतच निर्मल उद्योग समुहाचे माध्यमातून हजारो कुटुंबांला रोजगार मिळवून देत त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था केली.
याप्रसंगी उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, युवासेना, महिला आघाडी तसेच सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, पाचोरा, भडगाव तालुक्यातील असंख्य नागरिक, माता, भगिनी, निर्मल सीडसचे समस्त संचालक मंडळ, कर्मचारी वृंद, निर्मल इंटरनॅशनल स्कूलचे सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.