पाचोरा तालुक्यात भोंदू बाबांचा सुळसुळाट, अनेक महिलांची फसवणूक.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२१/१२/२०२१
[सध्याच्या परिस्थितीत चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव गावात साधू व भिक्षुकी लोकांना तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. तसेच फेरीवाले व इतर व्यवसायीकांनी अंबे वडगाव गावात व्यवसायानिमित्त येतांना आपले स्वतःचे आधारकार्ड किंवा मतदान कार्ड सोबत बाळगावे ही विनंती.]
पाचोरा तालुक्यातील खेड्यापाड्यांमध्ये काही इसम जटा वाढवून अंगावर भगवे कपडे परिधान करत, साधूचा वेष धारण करून दिवसाढवळ्या भोळ्याभाबड्या जनतेला देवतांची व धर्माची गळ घालत घरातील पूर्वजांच्या नावाने व इतर धार्मिक आधार घेत भविष्य सांगण्याच्या हेतूने गावात व थेट घरात प्रवेश करून त्यांच्या मानसिकतेचा फायदा घेत अंधश्रद्धेत भर घालून घरातील महिला व पुरुषांची दिशाभूल करत आर्थिक लूट करत आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यासह सर्वदूर काही इसम डोक्यावर जटा वाढवून अंगावर भगवे कपडे परिधान करत साधू वेशात गावागावात फिरत आहेत. हे साधू वेषातील लोक भिक्षा न मागता, भावनेचा आधार घेत घराघरात घुसून महिला व पुरुषांशी संवाद साधून त्यांना एक प्रकारे संमोहित करत त्यांच्यावर कोणीतरी करणी, कवटाळ, जादुटोना केला आहे. तुमच्या घरात भूतबाधा आहे. तुम्हाला शेजारच्या लोकांपासून भीती आहे असे सांगतात. या या गैरप्रकारांने शेजारी, शेजारी रहाणाऱ्या लोकांमध्ये गैरसमज वाढत आहेत.
त्यासाठी तुम्हाला तोडगा करावा लागेल असे व इतर थोतांड करून त्यांच्याजवळ असलेले तावीत, धागादोरा व विशेष म्हणजे आमच्याकडे बिर कंगन असून या बिर कंगन मुळे आम्हाला दूर दृष्टी प्राप्त झाली आहे. असे सांगत दंतकथा रचून त्यांचे मागील आयुष्यातील व भविष्यातील बऱ्याचशा गोष्टी कथन करतात. या कथन केलेल्या गोष्टींपैकी बराचश्या घटना प्रत्येकाच्या आयुष्यात घडलेल्या असतात. यातूनच या साधूंवर संबंधित लोकांचा भरोसा बसतो व यातूनच तोडगा करण्यासाठी या भोळ्याभाबड्या लोकांकडून हजार रुपये रोख व धनधान्य घेऊन हे साधू पोबारा करत असतात.
तसेच यापैकी काही साधूंची वर्तणूक संशयास्पद असून हे साधू दिवसा गावात फिरून रेखी करतात व रात्री चोरट्यांना नकाशा देऊ त्यांच्या जवळचे काही लोक गावा, गावात घुसून चोऱ्या करत असल्याचा संशय जनतेतून व्यक्त केला जात असून अशा साधूंचा त्वरित बंदोबस्त करावा व गावातील पोलीस पाटील सरपंच व सुज्ञ नागरिकांनी अशा साधूंना गावात येऊ देऊ नये अशा सूचना करण्याचे ही काही सुज्ञ नागरिकांनी सुचवले आहे. कारण गावात असे भोंदू बाबा आल्यानंतर थोड्याच दिवसात गावातील घरात चोऱ्या होत आहेत. व गुरे चोरीला जात आहेत. असाही अनुभव काही गावातील नागरिकांनी बोलून दाखवला आहे.
सुचना = (सगळेच साधू, संत लबाड नसतात परंतु याचा फायदा घेत काही भामटे साधूचा वेश परिधान करून असे गैरवर्तन करत असल्याने आम्हाला या विषयावर बातमी बनवावी लागली आहे. कारण जनतेला जागृत करणे हे आम्ही आमचे आद्य कर्तव्य समजतो म्हणून कोणीही या बातमीबद्दल गैरसमज करू नये)