दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२२/०९/२०२३

पाचोरा येथील भारद्वाज नेटवर्क सोल्युशन व ह्युमन डेव्हलपमेंट फाउंडेश कार्यालयाला आज पाचोरा तालुक्याचे प्रांताधिकारी मा. श्री. भुषण अहिरे साहेब यांनी पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. श्री. राहुलजी खताळ यांच्या समवेत सदिच्छा भेट दिली. यावेळी भारद्वाज नेटवर्क सोल्युशन व ह्युमन डेव्हलपमेंट फाउंडेशचे संस्थेचे संचालक मा. श्री. गोकुळ सोनार यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

तदनंतर पोलीस निरीक्षक मा. श्री. राहुलजी खताळ यांच्या हस्ते भारद्वाज नेटवर्क सोल्युशन व ह्युमन डेव्हलपमेंट फाउंडेश कार्यालयातील श्री. गणेशाची आरती करण्यात आली. यावेळी प्रांताधिकारी मा. श्री. भुषणजी अहिरे यांनी संस्थेच्या विविध उपक्रमा संबंधित सविस्तर चर्चा करुन माहिती जाणून घेतली व संस्थेचे संचालक मा. श्री. गोकुळ सोनार व त्यांच्या सहकाऱ्यांना भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी नैना पाटील, सुशील खैरनार, रविंद्र मराठे, अकिब मलीक व बि. एन. एस. परिवाराचे सर्व सदस्य उपस्थित होते.