सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • स्वताचे घर वाऱ्यावर सोडून जनतेसाठी धाऊन येणाऱ्या महसूल, वीज वितरण व नगरपालिका यंत्रणेचा भावनिक सत्कार.

  • सत्यजित न्यूजच्या वृत्ताची दखल घेऊन लोहारी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तुळजाई शिक्षण मंडळाला नोटीस.

  • पाचोरा येथील माहेरवाशीण महिला डॉक्टरचा अपघाती मृत्यू, लंडनला शिक्षण घेण्याचे स्वप्न भंगले.

  • शौचालयाचा शोषखड्डा फुटल्याने गल्लीत दुर्गंधी, ग्रामपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष. भाग १

  • गुटखा प्रकरणातील मुख्य आरोपी एकनाथ पाटील पाचोरा पोलीसांच्या रडारवर, अजून काही गुटखा विक्रेत्यांची नावे समोर येण्याची शक्यता.

क्राईम जगत
Home›क्राईम जगत›वाडी येथील कापूस व्यापारी शेतकऱ्यांचा एक कोटी रुपयांचा कापूस घेऊन फरार.

वाडी येथील कापूस व्यापारी शेतकऱ्यांचा एक कोटी रुपयांचा कापूस घेऊन फरार.

By Satyajeet News
April 9, 2022
11981
0
Share:
Post Views: 214
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०९/०४/२०२२

(कापूस व्यापाऱ्याकडून फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगत आम्हाला आमचा पैसा कसा मिळेल याकरिता ते धडपडत आहेत.)

पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथून जवळच वाडी व शेवाळे ही दोन गावे आहेत. या गावांची ओळख म्हणजे जोडीने होते ती अशी की वाडी, शेवाळे ही नावे एकत्र घेतली जातात. याच गावापैकी वाडी या गावत मागील बऱ्याच वर्षापासून आजीच्या इस्टेटीवर भुजंग सारखा बाहेरगावाहून रहाण्यासाठी आलेला राजेंद्र भिमराव पाटील (हिवरेकर) आलेला आहे.


(तेल गेल, तुप गेल हाती धुपाटन आल या म्हणी प्रमाणे शेतकऱ्यांच्या हातात राहील्या आहेत त्या फक्त कापूस विक्रीच्या पावत्या)


(फसगत झालेले शेतकरी आपल्या व्यथा मांडताना.)

राजेंद्र भिमराव पाटील (हिवरेकर) याचे कुटुंब म्हणजे भिमराव पाटील हे मुळचे पाचोरा तालुक्यातील रोटवद नांद्रा या गावचे रहिवासी परंतु मागील काळात काही कारणास्तव ते भुसावळ जवळील हिवरे या गावी रहाण्यासाठी गेले होते. मात्र म्हणतात ना (किस्मत करे जोर तो कुंधा खोदे चोर) या उक्तीप्रमाणे राजेंद्रला वंशपरंपरेने वाडी येथील त्याच्या आजीची इस्टेट मिळाली म्हणून ते कुटुंब वाडी येथे रहावयास आले.


(दरवाजे, खिडक्या नसलेल्या या घरात चोरी झाल्याच्या खोट्या तक्रारी करुन राजेंद्र व रवींद्र पोलिसांच्या डोळ्यात धुळ फेक करुन आपल्या पापावर पांघरूण घालण्यासाठी प्रयत्न करत आहेत.)

सुरवातीला बाहेरगावाहून आलेल्या राजेंद्र भिमराव पाटील या कुटुंबाने चांगले वर्तन ठेवून वाडी गावातील लोकांचा विश्वास संपादन केला. वाडी गावातील त्यांच्या नातेवाईकांनी व लोकांनाही आपल्या गावात पोट भरण्यासाठी आलेले आहेत या सहानुभूतीने त्यांना भरभरून मदत केली. यातून या पाटील परिवारातील राजेंद्र त्याचे वडील भिमराव व राजेंद्रचा भाऊ रवींद्र यांनी नातेवाईकांचा सहारा घेत मागील दहा वर्षापासून कापसाचा व्यवसाय सुरु केला. सुरवातीला दोन दिवसाच्या वायदे बाजारावर दोन दिवसाच्या बोलीवर शेतकऱ्यांच्या कापूस मालाची खरेदी करुन तो घेतलेला कापूस बाहेर विकुन शेतकऱ्यांना त्यांच्या कापसाचे पैसे चुकते करत राहिलेल्या नफ्यावर राजेंद्र आपल्या परिवाराला सांभाळत होता.

सुरवातीला राजेंद्र हा उधार घेतलेल्या कापसाचे पैसे वेळेवर देत असल्याने व त्याच्या बोलघेवड्या स्वभावामुळे वाडी गावपरिसरातील लोकांना त्याने आपलेसे करुन घेतले होते. याच संधीचा फायदा घेत राजेंद्र पाटील याने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यासाठी सपाटा लावला परंतु राजेंद्र हा पहिल्यासारखा राहिलेला नव्हता. म्हणून त्याच्या मनात लोभ सुटल्याने म्हणा किंवा (विनाश काले विपरीत बुद्धि) म्हणजे विनाशाचा काळ जवळ आला म्हणजे विपरीत बुध्दी सुचते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

म्हणून त्याने वाडी येथील शेतकऱ्यांच्या विश्वासाचा गैरफायदा घेत शेतकऱ्यांकडून कापूस मोजून घेत कापसाचे पैसे नंतर देतो असे सांगत, चालढकल करत वाडी गावातील शेतकऱ्यांचा जवळपास एक कोटी रुपयांचा कापूस मोजून घेतला व शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी चालढकल करत होता. राजेंद्र हा आजपर्यंत इमानेइतबारे पैसे देत असल्याकारणाने या भरवशावर शेतकरी त्याचे म्हणण्यानुसार ऐकून घेत शेवटपर्यंत कापूस मोजून दिला.

यातच एका बाजूला शेतकऱ्यांनी कापूस पिकाचे वायद्यावर घेतलेले बि, बियाणे, खते व इतर दैनंदिन व्यवहार केलेले होते. शेतकऱ्यांनी कापूस विकून बरेच दिवस झाले तरी पैसे येत नसल्याचे पाहून संबंधितांनी शेतकऱ्यांना पैशासाठी तगादा लावला म्हणून ज्या, ज्या शेतकऱ्यांनी राजेंद्रला कापूस विकला होता त्यांनी राजेंद्रचा वायदा संपल्यावर त्याच्या मागे तगादा लावला शेतकऱ्यांनी पैशासाठी लावलेला तगादा व पैसे हडप करण्यासाठीचा राजेंद्रचा डाव असल्याने मागील दिड महिन्यापूर्वी राजेंद्रने पत्नी व दोन मुलांना घेऊन वाडी येथून पोबारा केला. राजेंद्र गाव सोडून गेल्यानंतर शेतकऱ्यांनी राजेंद्रचा भाऊ रवींद्र (शंकर) याच्यामागे तगादा लावला म्हणून रवींद्रने पैसे आज देतो उद्या देतो अशी आश्वासने देऊन एक एक दिवस शेतकऱ्यांना भूलथापांना मारत होता.

शेतकऱ्यांनी रवींद्रने दिलेल्या वायद्यावर संशय येऊ लागल्याने सगळ्या शेतकऱ्यांनी रवींद्रला धारेवर धरुन राजेंद्र कुठे आहे ते सांग नाहीतर आमचे पैसे दे असा तगादा लावला याच कालावधीत रवींद्र व रवींद्रने संगनमताने शेतकऱ्यांना अंधारात ठेवून उलटपक्षी शेतकऱ्यांना दोषी ठरवण्यासाठी खोटे, नाटे आरोप करुन जिल्हा पोलीस अधिक्षक जळगाव व पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला शेतकऱ्यांच्या गुन्हा नोंदवून आपले पाप झाकण्यासाठी केविलवाणा प्रयत्न केला आहे. तर दुसरीकडे कापूस विक्रेत्यांनी राजेंद्र, रवींद्र, भिमराव यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असून राजेंद्र व रवींद्र यांना शोधून त्यांच्यावर रीतसर गुन्हा दाखल करुन आम्हाला आमच्या कापसाचे पैसे मिळवून द्यावेत अशी तक्रार दाखल केली आहे.

तक्रार दाखल झाल्यानंतर पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी सत्य परिस्थिती जाणून घेत कापूस व्यापारी राजेंद्र व रवींद्रचा शोध सुरु केला असून त्यांना लवकरात लवकर पकडण्यासाठी पिंपळगाव हरेश्वर पोलीस प्रयत्नशील असल्याचे समजते.

भिमराव पाटील यांचा मागील इतिहास~
भिमराव पाटील हे पाचोरा तालुक्यातील रोटवद नांद्रा येथील रहिवासी परंतु त्यांच्या गैरव्यवहारामुळे त्यांना मुळचे रोटवद नांद्रा गाव सोडून बाहेरगावी जावे लागले म्हणून त्यांनी भुसावळ जवळील हिवरे गावात त्यांनी ठाण मांडले परंतु तेथेही संसाराचा गाडा ठीक चालत नसल्याने याच कालावधीत वाडी येथील आजीची वडिलोपार्जित शेत जमीन आयतीच मिळाल्याने त्यांनी आपला पडाव वाडी गावत आणून तेथे ते स्थाईक झाले. मात्र येथेही त्यांना अवदसा सुचली व वाडी गावातील शेतकऱ्यांचा जवळपास एक कोटी रुपयांचा कापूस मोजून घेत शेतकऱ्यांच्या हातावर तुरी देत वाडी गावातून पलायन केले असल्याने कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.

कारण आजच्या परिस्थितीत ज्यांनी, ज्यांनी राजेंद्र व रवींद्र यांना कापूस विकला आहे. त्या शेतकऱ्यांच्या हातात फक्त आणि फक्त राजेंद्रने मोजून घेतलेल्या कापसाच्या वजनाची व कापसाच्या होणाऱ्या किंमतीची पावतीच हातात शिल्लक राहीलेली आहे. आता या दिलेल्या कापसाचा कापसाचा पैसा परत मिळवणे म्हणजे खुपच अवघड असून कुणाच्यातरी भरवशावर पाण्यात बसलेली म्हैस म्हणजे फक्त डबक्यातील शिंगे पाहून म्हैस विकत घेणे व म्हशीला उठवायला गेल्यावर फक्त चिखलात गाडलेली शिंगे हातात येणे असा प्रकार घडू नये म्हणजे झाले.

(कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा कापूस घेऊन कापूस व्यापारी फरार झाल्यावर त्रस्त शेतकरी हतबल झाला असून आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नसल्याचे मत बोलून दाखवले आहे. परंतु या विषयावर आत्महत्या हा पर्याय नसून संघर्ष करा नक्कीच यश येईल व कायद्याचे रक्षक आपल्याला नक्कीच न्याय मिळवून देतील यात शंका नाही. सत्यजित न्यूज पाचोरा)

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रामविकास विद्यालयातील नियमबाह्य शिक्षक ...

Next Article

आईच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पित्याचा रागाच्या भरात ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • क्राईम जगत

    घरगुती गॅस वाहनात भरतांना शिरसोली येथील आरोपी मुद्देमालासह स्थानिक गुन्हा शाखेच्या ताब्यात.

    September 30, 2024
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    विजयी मिरवणुकी दरम्यान रस्त्यावर उभ्या असलेल्या महिलांचा विनयभंग २४ व्यक्तींविरोधात पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल.

    November 26, 2024
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    पाचोरा तालुक्यातील सांगवी प्र. लो. येथून दिड लाख रुपये किंमतीच्या सहा गुरांची चोरी.

    January 26, 2025
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    कुऱ्हाड येथील नाईकनगर रस्त्यावर सोशल डिस्टेंसिंगचा फज्जा, मटणाच्या दुकानावर झाली तोबा गर्दी.

    April 14, 2021
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    पहुर पोलीस स्टेशनला गावठी हातभट्टी विक्रेत्यावर एम. पी. डी. ए. अंतर्गत जिल्ह्यातील पहिली कारवाई.

    December 28, 2023
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    सातगाव डोंगरी येथील स्वस्त धान्य दुकानाच्या सेल्समन विरोधात, पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल.

    September 20, 2022
    By Satyajeet News

You may interested

  • महाराष्ट्र

    *चौफेर व्यक्तिमत्वाचे उभरते नेतृत्व !- प्रवीण ब्राह्मणे*

  • पाचोरा तालुका.

    कडे वडगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ए. टी. डब्लू. कार्डधारकांना मिळतेय शुध्द व थंडगार पाणी.

  • आपलं जळगाव

    सावखेडा येथील पिडीत कुंटूबीयांची जिल्हापरिषद सदस्य मधुकर काटे. यांनी घेतली भेट.

दिनदर्शिका

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज