सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.

  • बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हाधिकारी व वैद्यकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित.

  • ब्लॅक आऊट व मॉक ड्रिलच्या कालावधीत डी. जे. व शारपी लाईटचा धिंगाणा, डिजे मालकांवर कठोर कारवाईची मागणी.

  • सार्वे प्र. लो. शिवारातुन पन्नास हजार रुपये किंमतीच्या बैलाची चोरी.

  • बिबट्याचा हल्ल्यात एक मजूर जखमी, अंबे वडगाव ते पाचोरा रस्त्याच्या कामावरील मजूरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर.

क्राईम जगत
Home›क्राईम जगत›पकडा गया वो चोर है बाकी सब शिरजोर है, अडीच लाखांची लाच मागणी भोवली सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते जाळ्यात.

पकडा गया वो चोर है बाकी सब शिरजोर है, अडीच लाखांची लाच मागणी भोवली सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते जाळ्यात.

By Satyajeet News
July 6, 2021
899
0
Share:
Post Views: 146
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०६/०७/२०२१

आजच्या परिस्थितीत बोटावर मोजण्याइतके अधिकारी व कर्मचारी सोडल्यास सगळीकडे चिरीमिरी दिल्याशिवाय घेतल्याशिवाय वेळेवर कामे होत नाहीत. व यातूनच दिवसेंदिवस भ्रष्टाचार फोफावत असल्याने खऱ्याचे खोटे लबाडाचे तोंड मोठे अशी प्रकरणे घडत आहेत. परंतु ८० टक्के लोक गरजेपोटी काम लवकर झाले पाहिजे म्हणून मजबुरीने या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचे बळी ठरतात व बळी जात आहेत.

यामागचे एकमेव कारण म्हणजे लोकप्रतिनिधींचा बेजबाबदार पणा असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. परंतु काही सजग नागरिक लाच देणे मान्य न करता सरळ सरळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करून असे प्रकार उघडकीस आणतात खरे तर अशा लोकांचे जाहीर सत्कार झाले पाहिजे.

अशीच एक घटना जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे घडली असून अमळनेर येथील सार्वजनीक बांधकाम विभाग उप अभियंताच्या सांगण्यानुसार कनिष्ठ अभियंत्याने बांधकाम ठेकेदार कंपनीच्या इंजीनीयरकडे काढलेल्या बिलाच्या बदल्यात मागीतलेली २ लाख ५८ हजार रुपयांची लाच दोघांना महागात पडली आहे. उप अभियंता व कनिष्ठ अभियंता असे दोघे अभियंते धुळे एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. उपविभागीय अभियंता (वर्ग १) दिनेश पाटील व कनिष्ठ अभियंता सत्यजीत गांधीलकर असे लाच प्रकरणात अडकलेल्या दोघा अभियंत्यांची नावे आहेत.

तक्रारदार हे धुळे येथील कंस्ट्रक्शन कंपनीत साईट इंजिनियर म्हणून कामाला आहेत. या कंपनीचा आर्थिक व्यवहार त्यांच्याकडे आहे. नंदुरबार येथील एका कंस्ट्रक्शन कंपनीने सार्वजनिक बांधकाम विभाग,अमळनेर यांचे कडुन आदिवासी मुलींच्या वस्तीगृहाच्या बांधकामाचा ठेका घेतला आहे. तक्रारदार काम करत असलेल्या ठेकेदार कंपनीने या बांधकामाचे काम करारनामा करुन आपल्याकडे घेतले आहे. सदर आदिवासी मुलींच्या वस्तीगृहाच्या आतापावेतो झालेल्या बांधकामाचे बिल कंस्ट्रक्शन कंपनीस अदा करण्यात आले आहे. या अदा केलेल्या बिलाच्या रकमेच्या मोबदल्यात दिनेश पाटील (उपविभागीय अभियंता वर्ग १) यांनी कनिष्ठ अभियंता सत्यजीत गांधीलकर यांच्या माध्यमातून तक्रारदाराकडे २ लाख ५८ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे एसीबीच्या पडताळणीत सिद्ध झाले.

त्यानुसार धुळे एसीबीने दोघांविरुध्द अमळनेर पोलीस स्टेशनला भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदयाचे कलम ७ व १२ प्रमाणे आज रोजी गुन्हा दाखल केला आहे. दोघा आरोपींना देखील ताब्यात घेतले आहे. पोलीस अधीक्षक सुनिल कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक सतिष भामरे , पोलीस उप अधीक्षक सुनिल कुराडे, पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे, पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण तसेच जयंत साळवे, कैलास जोहरे, शरद काटके, राजन कदम, कृष्णकांत वाडिले, पुरुषोत्तम सोनवणे, संदीप कदम, प्रशांत चौधरी, भुषण खलाणेकर, भुषण शेटे, संतोष पावरा, महेश मोरे, सुधीर मोरे, गायत्री पाटील यांनी या सापळ्यात सहभाग घेतला.

(संबधीताचे संपत्तीची चौकशी होऊन भ्रष्टाचाराने कमावलेली मालमत्ता शासनाच्या खजिन्यात जमा करावी अशी मागणी जनतेतून होत आहे.)

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

पाचोऱ्यात भाजपा ने काढली ठाकरे सरकारची अंतयात्रा ...

Next Article

मैत्रय गुंतवणूकदारांच्या परताव्या बाबत उद्या मंत्रालयात बैठक.

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • क्राईम जगत

    मोराड गावातील जुगार अड्ड्यावर पोलीस पोहचताच जुगारी फरार.

    December 1, 2023
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    बजरंग दल कार्यकर्ताच्या सतर्कतेमुळे कत्तलखान्यात जाणारी गुरे बचावली.

    May 27, 2021
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    नाकाबंदी दरम्यान अनाधिकृत गुटखा वाहतूक करणाऱ्या वाहनावर पाचोरा पोलीसांच्या दबंग कारवाईत ३० लाख ५४ हजारांचा मुद्देमाल जप्त.

    April 2, 2025
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    अंबे वडगाव येथील हॉटेल प्रधान येथून जनरेटरचा डायनामा चोरीला.

    February 14, 2024
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    मागील भांडणाच्या कारणावरुन एकाला मारहाण व जीवे मारण्याची धमकी, पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला अदखलपात्र गुन्हा दाखल.

    April 13, 2024
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    शेजाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून वडगाव जोगे येथील चव्हाण कुटुंबीयाची पोलीसात धाव.

    August 22, 2024
    By Satyajeet News

You may interested

  • सांस्कृतिक

    भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव खान्देशात मोठ्या उत्साही वातावरणात_साजरा होणार.

  • आपलं जळगाव

    एकोणतीस वर्षाच्या दिर्घमुदतीने मिळणार व्यापारी गाळे ना.एकनाथराव शिंदे, आ.किशोर अप्पा पाटील यांचा पाठपुरावा फलदायी.

  • ब्रेकिंग न्यूज

    गाळण बुद्रुक येथील सर्पदंश झालेल्या शेतकऱ्याचा वाटेतच मृत्यू .

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज