संविधान दिनाचे औचित्य साधत अखिल मराठा समाजसेवा प्रतिष्ठान व न्यू माऊली नेत्रालय तर्फे सातगाव डोंगरी येथे नेत्र तपासणी शिबिर संपन्न.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/११/२०२२

आज दिनांक २७ नोव्हेंबर २०२२ रविवार रोजी संविधान दिनाचे औचित्य साधत पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी येथे अखिल मराठा समाज सेवा प्रतिष्ठान महाराष्ट्र व सुभाष अशी बहुद्देशीय संस्था संचलित न्यु माउली नेत्रालय पाचोरा यांच्या सयुक्त विद्यामाने नेत्र तपासणी शिबिर सातगाव डोंगरी येथील आदर्श आश्रम शाळेत आयोजित करण्यात आले होते.

या शिबिराचे उद्घाटन सकाळी ०९ वाजता राजे छत्रपती शिवाजी महाराज व डॉ, बाबा साहेब अंबेडकर यांचे प्रतिमा पूजन संस्थापक अध्यक्ष प्रा, डॉ, योगेश पाटील संस्थापक सचिव संजय पाटील शाखा अध्यक्ष सतीष पाटील, सरपंच उषा सुभाष पाटील, उपसरपंच शकीला तडवी मा, सरपंच भारत राठौड़ ग्रामपंचायत पंचायत सदस्य सागर चौधरी, अंबादास मल्हार, आबा भागवत पाटील, दीपाली सतीष पाटील, शांताबाई ज्ञानेश्वर पाटील, आदर्श आश्रम शाळा मुख्य ध्यापक राहुल पवार, पों, बे हायस्कूल मुख्य ध्यापक उत्तम मनगटे, फार्मसिस्ट गोपाल नाईक, यांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.

या शिबिरांत गावातील अनेक नागरिकांनी नेत्र तपासणी करण्यात आली. याप्रसंगी प्रत्येक गावात मोफत नेत्र तपासणी शिबिर व आरोग्य शिबिर घेण्याचा मानस अध्यक्ष प्रा.डॉ.योगेश पाटील व सचिव संजय पाटील यांनी यावेळी केला. या शिबिरासाठी अखिल मराठा समाज सेवा प्रतिष्ठान (महा)शाखा डोंगरी साजगावचे सर्व पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

या प्रसंगी न्यु. माऊली नेत्रा लयाचे opthometrist संतोष पवार, संदीप राठोड सह प्रतिष्ठानचे शाखा सातगाव अध्यक्ष-सतीश बाजीराव पाटील ,उपाध्यक्ष-उमेश अशोक पाटील, सचिव-ज्ञानेश्वर रामदास पाटील,सदस्य -भिला आधार पाटील,बाळु राघो बोरसे ,संतोष खंडू बछे,समाधान रामदास पाटील,भगवत महादु पाटील,रामा शंकर पाटील, सतीष रमेश पाटील,प्रकाश हिलाल पाटील,दत्तू शंकर पाटील,कैलास शंकर बछे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्तित होते.

ब्रेकिंग बातम्या