जिल्हा उद्योग केंद्राच्या प्रकल्प अधिकाऱ्याला १० हजारांची लाच घेताना अटक.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/०६/२०२१
जळगावातील जिल्हा उद्योग केंद्र कार्यालय येथील प्रकल्प अधिकाऱ्याला शासनाच्या योजने अंतर्गत कर्ज व सबसिडी योजनेचा लाभ मिळणेकामी तक्रारदाराचे प्रकरण बँकेत पाठविण्यासाठी १० हजारांची लाच स्वीकारताना जळगावच्या लाचलुचपत विभागाच्या पथकाने आज अटक केली असून यामुळे खळबळ उडाली आहे. आनंद देविदास विद्यागर, वय-५०रा.अजय कॉलनी,रिंग रोड, जळगाव.ता.जि.जळगाव असे या प्रकल्प अधिकाऱ्याचे नाव आहे.
तक्रारदार हे सुशिक्षीत बेरोजगार असुन त्यांनी PMEGP या शासनाच्या योजने अंतर्गत कर्ज व सबसिडी योजनेचा लाभ मिळणेकामी तक्रारदार यांचे प्रकरण अपलोड करून सदर प्रकरण बँकेस पाठविण्याच्या मोबदल्यात आरोपी यांनी तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष १० हजार लाचेची मागणी केली . हि रक्कम मागणीप्रमाणे त्यांनी स्वत: पंचासमक्ष स्विकारताना अटक करण्यात आली.
यांनी केली कारवाई
पोलीस उप अधीक्षक सतीश डी.भामरे, पोनी संजोग बच्छाव, सफौ.दिनेशसिंग पाटील, पोहेकॉ.अशोक अहीरे, पोहेकॉ.सुनिल पाटील, पोहेकॉ.रविंद्र घुगे, पोना.मनोज जोशी, पोना.सुनिल शिरसाठ, पोना.जनार्धन चौधरी, पोकॉ.नासिर देशमुख, पोकॉ.ईश्वर धनगर, पोकॉ.प्रदिप पोळ, पोकाॅ.महेश सोमवंशी.
Bhagwan Sonar