पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रामविकास विद्यालयातील नियमबाह्य शिक्षक भरती विरोधात लवकरच फौजदारी गुन्हा दाखल करणर. किशोर गरुड.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०९/०४/२०२२
सद्यस्थितीत महाराष्ट्रात सगळीकडे बोगस शिक्षक भरती घोटाळा गाजत असून तशी जिल्हानिहाय आकडेवारी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी चौकशी सुरु झाली असल्याचे बोलले जाते. अशीच बोगस शिक्षक भरती पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रामविकास मंडळ संचलित ग्रामविकास विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयात झाली असल्याची तक्रार संबंधित विभागाकडे करुन सुध्दा या तक्रारीची सखोल चौकशी केली जात नसल्याने मी आता लवकरच फौजदारी गुन्हा दाखल करुन न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती पिंपळगाव हरेश्वर येथील मा. श्री. किशोर भिकनराव गरुड यांनी दिली आहे.
(विषेश म्हणजे)
ज्या शालेय शिक्षण संस्थेत माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाची व्यवस्था उपलब्ध आहे. अशा या शिक्षणसंस्थेचा कारभार एक दहावी उत्तीर्ण असलेल्या व्यक्तीच्या हातात असल्याची खंत व्यक्त करत भावी पिढीला हे घातक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
(मा.श्री. देवीदास महाजन.संस्थाध्यक्ष)
आमच्या ग्राम विकास मंडळ संचालित ग्रामविकास विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाचा कारभार पारदर्शी असून आमच्या संस्थेत कोणत्याही शिक्षक भरत्या बोगस किंवा नियमबाह्य झालेल्या नसून काही विघ्नसंतोषी लोक आमच्या संस्थेबद्दल खोटे, नाटे पुरावे दाखवून वैयक्तिक व्देशापोटी आमच्या संस्थेला काही लोक बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. या संबंधित तक्रारींची आम्ही दखल घेतली असून आम्ही आता प्रसारमाध्यमांनसमोर या आरोपांचे पुराव्यानिशी खंडण करणार असून आमच्या संस्थेला हकनाक बदनाम करणाऱ्या अशा विघ्नसंतोषी व्यक्ती विरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. देवीदास महाजन.(पाटील) यांनी भ्रमणध्वनीवर सत्यजित न्यूजला दिली आहे.