खडकदेवळा हायस्कूल मध्ये ग्रंथ प्रदर्शन उत्साहात संपन्न.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/१०/२०२३
सद्यस्थितीत सगळीकडे मोबाईलची प्रमाणापेक्षा जास्त गोडी लागल्याने तरुणवर्ग वाचनसंस्कृती पासून लांबा जात आहे. यामुळे विद्यार्थीवर्ग व तरुणांमध्ये वाचनाची गोडी कायम टिकून रहावी तसेच “वाचाल तर वाचाल” हे तत्व पटवून देण्यासाठी पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथील साईनाथ सार्वजनिक वाचनालय, वाय. पी. पाटील फाउंडेशन व माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले होते.
या आयोजित ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुरेखा सोनवणे मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली व पर्यवेक्षिका श्रीमती कुंदा पाटील. (शिंदे) यांच्या शुभहस्ते करण्यात आले या ग्रंथ प्रदर्शनात वाचनातून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर टाकणारे जवळपास ६०० ग्रंथ व अन्य वाचनीय पुस्तके प्रदर्शनात समावेश मांडण्यात आली होती. या ग्रंथ प्रदर्शनाचा सकाळ व दुपार सत्रातील विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.
यावेळी विश्वस्त प्रमोद गरुड, साईनाथ वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. यशवंत पाटील, संचालक विश्वास पाटील, संजय पाटील तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना प्रमोद गरुड व डॉ. यशवंत पाटील यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. चंद्रकांत पाटील यांनी सुत्रसंचलन तर अतुल घोडेस्वार यांनी आभार प्रदर्शन केले.