सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जिल्हा परिषदेकडून दत्त माध्यमिक विद्यालयाला कढलेली नोटीस वादळवाऱ्यात उडाल्याचा संशय.

  • अंबे वडगाव तांडा नंबर दोन येथील महादेव मंदिरावर बाबांचे पुनरागमन, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर.

  • पिंप्री धरणावर अनाधिकृत ताबा घेऊन माती उचल करणाऱ्यांकडून सक्तीने वसूली.

  • पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या बदलीसाठी हरीभाऊ पाटील यांचा आंदोलनाचा इशारा.

  • पाचोरा पीपल्स बॅंकेने मुस्ताक पिंजारी यांना दिला पत्ता ठेवून झब्बू, वडिलोपार्जित घराची परस्पर विक्री.

क्राईम जगत
Home›क्राईम जगत›आईच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पित्याचा रागाच्या भरात मुलांनीच केला खून.

आईच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पित्याचा रागाच्या भरात मुलांनीच केला खून.

By Satyajeet News
April 10, 2022
2367
0
Share:
Post Views: 167
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१०/०४/२०२२

आईच्या चारीत्र्यावर वडिलांनी संशय घेतल्यामुळे घरात आई व वडिलांमध्ये भांडणास सुरुवात झाली. वडिलांनीच आपल्या आईच्या चारित्र्यावर संशय घेतल्यामुळे हा प्रकार मुलांना सहन झाला नाही व हे भांडण इतक्या टोकाला गेले की या झालेल्या टोकाच्या भांडणातून दोघा मुलांनी पित्यावर धारदार चाकूचे सपासप पाच वार केल्याने पित्याचा जागीच मृत्यू झाला. ही धक्कादायक पाचोरा शहरातील भास्कर नगरात रविवारी मध्यरात्री घडली. संजय बंकट खेडकर (४६) असे खून झालेल्या इसमाचे नाव असून खून याप्रकरणी मयताची मुले रोहित उर्फ रोहित खेडकर वय (२२) वर्षे व मनोज खेडकर वय (२४) वर्षे या भावंडांना संशयित आरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे.

(आईच्या चारीत्र्यावर घेतलेल्या संशयावरून पित्याची केली हत्या.)
पाचोरा शहरातील भास्कर नगरात खेडकर कुटुंब वास्तव्यास आहे. संजय खेडकर हे इलेक्ट्रीकल व्यावसायीक असून त्यांचे पाचोरा शहरात इलेक्ट्रीक दुकान आहे. खेडकर हे पत्नीच्या चारीत्र्यावर सतत संशय घेत असल्याने कुटुंबात शनिवारी रात्री जोरदार भांडण झाले. हे भांडण शनिवार रात्री ते रविवार मध्यरात्री पर्यंत सुरूच होते. जन्म देत्या आईच्या चारीत्र्यावर वडिलांनीच संशय घेतल्यामुळे दोघेही मुले कमालीची चिडले होत.

यातच भाडण सुरु असतांनाच शाब्दिक चकमकीने टोकाची परिसीमा गाठल्यावर चिडलेल्या मनोज व प्रतीक उर्फ रोहित या दोघ मुलांनी रागा, संतापाच्याभरात घरातील धारदार चाकूने वडिलांच्या पोटावर व डोक्यावर सपासप वार केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असल्याची प्रथम माहिती समोर येत आहे. ही घटना रविवार रोजी सकाळी उघडकीस आल्यानंतर पोलिस उपअधिक्षक भरतजी काकडे व पोलिस निरीक्षक नजन पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. समोरील परिस्थिती व मिळालेल्या माहितीनुसार मयत संजय बंकट खेडेकर यांच्या रोहित उर्फ प्रतीक व मनोज या सख्या मुलांना खुनाच्या आरोपाखाली अटक केली असून या संशयित आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेची माहिती पाचोरा शहरात वाऱ्यासारखी पसरल्यावर घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

वाडी येथील कापूस व्यापारी शेतकऱ्यांचा एक कोटी ...

Next Article

नांद्रा प्र.लो येथे श्रीराम नवमी निमित्त रक्तदान ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • क्राईम जगत

    पशुधन चोरीच्या गुन्ह्यातील चार संशयितांना स्थानिक गुन्हे शाखा व पिंपळगाव हरेश्वर पोलीसांनी ठोकल्या बेड्या.

    February 23, 2025
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    कुऱ्हाड गावात कापूस व्यापाऱ्यांकडून मापात पाप, लबाड लांडग्यांचे वजन काटे ग्रामस्थांनी घेतले ताब्यात.

    February 8, 2023
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    रोहिणीताई खडसे हल्ल्याप्रकरणी शिवसेनेच्या तीन पदाधिकाऱ्यांसह सात जणांवर गुन्हा दाखल,अद्याप कुणालाही अटक नाही.

    December 29, 2021
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    वडगाव आंबे येथील तलाठ्याचे कामकाज व्हेरी फाइन, ५०० रुपयांची लाचही स्विकारली ऑनलाईन.

    August 5, 2021
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    सोयगावच्या लाकुड व्यापाऱ्यांचा पिंपळगाव हरेश्र्वर येथील हॉटेलमध्ये ठिय्या, वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी करतात त्याच्या भोवती ता,था,थैय्या.

    June 2, 2022
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    वावडदा परिसरात सट्टा,पत्ता,रेती,जोमाने सुरू, गुन्हेगारीला मिळतेय आमंत्रण पोलिसांची डोळेझाक.

    July 31, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • Uncategorized

  • क्रिडा क्षेत्र.

    कुऱ्हाड येथे उद्या कुस्त्यांची भव्य दंगल.

  • आरोग्य

    गरुड महाविद्यालयात “मिशन युवा स्वास्थ्य” अतंर्गत कोविड १९ प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिर संपन्न.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज