आज श्री. अंबीका देवीच्या यात्रोत्सव निमित्ताने सालाबादप्रमाणे विविध कार्यक्रमांचे आयोजन।
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०१/०४/२०२२
सालाबादाप्रमाणे अंबे वडगाव येथे आपल्या गावाच्या अंबीका देवीची यात्रा दिनांक २ एप्रिल २०२२ शनिवार रोजी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर साजरी होणार आहे. यावर्षीची यात्रा ही आपल्या सर्वांसाठी अविस्मरणीय राहणार असुन आपल्या ग्रामदैवत असलेल्या अंबिका मातेच्या मंदीराचा निर्णोद्धार झालेला असुन नवीन मंदिरावर कळस स्थापना होणार आहे. दिनांक २ मार्च २०२२ शनिवार रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी कळसाची मिरवणुक काढून हा मिरवून आणलेला कळस भाविक, भक्तांसाठी दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता कळस पूजन करत होम, हवन करुन मोठ्या जयघोषात ३ वाजून १२ मिनिटांच्या शुभमुहूर्तावर कळसाची स्थापन करण्यात येणार आहे.
याकळस पुजनासाठी इच्छुक असलेल्या भाविक भक्तांना होमहवन पुजेचा लाभ घ्यायचा असल्यास इच्छुक दांपत्यानी अंबीका देवी यात्रा उत्सव समितीच्या पंचाकडे त्वरित नावे नोंदवून होम, हवनाच्या पुजेसाठी बसणाऱ्या दांपत्यासाठी पुजेच्या सामुग्रीसाठी लागणारी दक्षिणा ११००/०० पंच कमिटीकडे जमा करून पुजेचा लाभ पदरात पाडून घ्यावा म्हणजे पुजेसाठी बसणाऱ्या भाविकांची व्यवस्था करण्यात येईल असे आवाहन पंच मंडळाकडून करण्यात आले आहे.
तसेच भाविक, भक्तांसाठी महत्वाची सुचना म्हणजे यावर्षी यात्रोत्सवासाठी शासकीय नियमानुसार परवानगी मिळालेली नसल्याने सर्वांनी शांतता व सुव्यवस्था ठेवून यात्रोत्सवात शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे. तसेच यात्रोत्सवात जर कुणीही गोंधळ घालण्याचा प्रयत्न केल्यास गोंधळ घालणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा खुलासा पंच मंडळाने केला असून संपूर्ण यात्रोत्सवावर व्हि.डी.ओ. कॅमेऱ्याद्वारे कडक नजर ठेवण्यात येणार आहे.
गुढीपाडवा यात्रोत्सवात गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे दिनांक २ एप्रिल २०२२ शनिवार रोजी सकाळी ६ वाजता ध्वजारोहण, १० वाजता गावातून कलश मिरवणुक, ३ वाजता तगतराव मिरवणुक, ४ वाजता बारागाड्या ओढणे, सायंकाळी ५ वाजता तमाशा हजेरी, रात्री ९ नऊ वाजेपासून लोकनाट्य तमाशा ठेवण्यात आला आहे.
दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता कळसपुजन, होम, हवन, दुपारी १२ वाजता कळसारोहन, दुपारी ३ वाजता कुस्त्यांची दंगल. नंतर दिनांक ४ एप्रिल २०२२ सोमवार रोजी रात्री सांस्कृतिक कार्यक्रम, ५ एप्रिल २०२० मंगळवार रोजी रात्री सांस्कृतिक कार्यक्रम, दिनांक ६ एप्रिल २०२२ बुधवार रोजी सायंकाळी ५ वाजता दहीहंडी तसेच यात्रेच्या वर्गणीचा व झालेल्या खर्चाचा हिशोब वाचून दाखवत येईल नंतर रात्री सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. अश्या पध्दतीने यात्रोत्सव साजरा करण्यात येणार असून हा यात्रोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सगळ्यांनी यात्रेत सहभागी होऊन यात्रोत्सवाची शोभा वाढवावी अशी विनंती अंबीका माता यात्रोत्सव पंच मंडळ (कमेटी) व ग्रामस्थांनी केली आहे.