दिगंबर जैन बांधवांचा पर्युषण पर्व १० सप्टेंबरला सतीश जैन व सुलभा जैन हस्ते महापूजेचे प्रारंभ.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१३/०९/२०२१
दिगंबर जैन बांधवांचा १० सप्टेंबर शुक्रवार पासून पर्युषण महापर्वास प्रारंभ होत आहे. हा पर्व दहा दिवसीय असून १९ सप्टेंबर पर्यंत सुरू राहणार आहे. या दहा दिवसातील प्रथम दिवशी श्री.सतीश वसंतीलाल जैन इंद्र तर इंद्रायणी सौ.सुलभा सतीश जैन यांच्या हस्ते महापुजनाने दशलक्षण महापर्वाच्या पूजन विधी कार्यक्रमाची सुरुवात होणार असल्याची माहिती गौरव उल्हास जैन आणि ओम राजेंद्र जैन यांनी दिली.
विशेष म्हणजे या वर्षी कुसुंबा धर्म नगरीत सोळा वर्षानंतर दिगंबराचार्य चर्या चक्रवर्ती आचार्य श्री १०८ सुनील सागर जी महाराज यांचे अज्ञानुवर्ती शिष्य मुनि श्री १०८ सुधेय सागर जी महाराज यांच्या चातुर्मास स्थापनेमुळे भाविकांमध्ये विशेष उत्साह उमंगत आहे. चातुर्मासातील विशेष धार्मिक महोत्सव शासकीय नियमानुसार सुरक्षित अंतर ठेवून संपन्न होत आहे. या पर्वात प्रतिदिन मुलनायक श्री कुंथुनाथ भगवान अभिषेक तसेच विश्वशांती व सुख-समृद्धीसाठी मुनीश्रींच्या वाणीतून शांतीमंत्र वाचन, सामूहिक संगीतमय पर्व पूजा तसेच नित्य पूजा, आहारचर्या नंतर तत्वार्थसूत्र वाचन, शांतीनाथ महामंडल पूजा, मंगल प्रवचन, सायंकाळी संगीतमय महाआरती. प्रत्येक दिवशी दिलेल्या इंद्र इंद्रायणी यांच्यातर्फे पूजा संपन्न होणार उत्तम क्षमा दिनी सौ. सुलभा सतीश जैन, उत्तम मार्दव दिनी श्री.राजेंद्र रतनलाल जैन, उत्तम आर्जव दिनी श्री.प्रदीप माणकलाल जैन, उत्तम शौच दिनी श्री. पंकज नागिंदास जैन, उत्तम सत्य दिनी श्री.संजय मोतीलाल जैन, उत्तम संयम दिनी श्री.विजय गमनलाल जैन, उत्तम तप दिनी श्री. किरण प्रेमचंद जैन, उत्तम त्याग दिनी श्री.महावीर सुभाष जैन, उत्तम आकिंचन्य दिनी श्री.संजय नवणीतलाल जैन, उत्तम ब्रह्मचर्य दिनी श्री. राहुल दिलीप शहा च्या यांच्या तर्फे संगीतबद्ध महापूजा सुयोग जैन यांच्याद्वारे संपन्न होणार आहे. याकामी पार्श्वनाथ जैन सेवा प्रतिष्ठान तसेच पद्मावती युवा मंच आणि समाज बांधव विशेष परिश्रम घेत आहे.