पालकमंत्री व आमदारांचा दरवाजा ठोठावला, तरीही मला न्याय मिळत नाही “मी एकटा पडलो” किशोर गरुड यांनी कैफियत.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०१/०४/२०२२
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रामविकास मंडळ संचलित ग्रामविकास प्राथमिक व माध्यमिक विद्यालयत बोगस शिक्षक भरती झाली असून या बोगस शिक्षक भरती बाबत चौकशी होऊन योग्य लाभार्थी निवडून नियमानुसार शिक्षक भरती व्हावी व बोगस शिक्षक भरती करणास जबाबदार असलेल्या संचालक मंडळावर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी पिंपळगाव हरेश्वर येथील व ग्रामविकास मंडळाचे सभासद मा. श्री. किशोर भिकनराव गरुड यांनी शिक्षणाधिकारी जिल्हापरिषद जळगाव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असून या मागणीचे निवेदन आपल्या महाराष्ट्र राज्याचे सहकार राज्यमंत्री तसेच पालकमंत्री मा.श्री. गुलाबरावजी पाटील व पाचोरा, भडगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा.श्री. किशोर आप्पा पाटील यांच्याकडे दिनांक २३ ऑगस्ट २०२१ रोजी देऊन न्यायाची मागणी केली होती परंतु मा.पालकमंत्री व मा.आमदारांनी माझ्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने या न्यायप्रविष्ट प्रकरणात मी एकटा पडलोय अशी खंत किशोर गरुड व्यक्त केली आहे.
विशेष म्हणजे आपल्या आमदार साहेबांनी बोगस शिक्षक भरतीबाबत विधानसभेत आवाज उठवला होता तेव्हा आम्हाला न्याय मिळेल अश्या आशा फल्लवीत झाल्या होत्या, मात्र तदनंतर आमदारांनी पाठपुरावा केला नाही म्हणून की काय या विषयाकडे सगळ्यांनीच दुर्लक्ष केले असून अधिकारीवर्ग मनमानी करत असल्याचे सांगत त्यांनी मा.पालकमंत्र्यांना दिलेल्या तक्रारी अर्जाची पोहच दाखवत नाराजी व्यक्त केली आहे.