काकणबर्डी यात्रेला परवानगी द्या,कॉंग्रेस अध्यक्ष सचिन सोमवंशी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०९/१२/२०२१
पाचोरा-भडगाव तालुक्यातील आस्थेचा विषय असलेल्या काकणबर्डी यात्रेला परवानगी देण्यात यावी अशी मागणी कॉंग्रेस ने उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पाचोरा शहरा जवळ असलेल्या काकणबर्डी येथे खंडोबांचे देवस्थान आहे. याठिकाणी भाविक मोठ्या भक्तीभावाने दर्शन घेण्यासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. मागिल काळात गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे सदरची यात्रा रद्द करण्यात येत होती. मात्र यंदाच्या वर्षी बर्याच प्रमाणात कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात यात्रा उत्सव साजरे होत आहेत.
त्याच अटी शर्थी वर काकणबर्डी येथील यात्रा उत्सव साजरा करण्यासाठी परवानगी देण्यात यावी अशी मागणी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष मा.श्री. सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस पदाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी मा.श्री. विक्रमजी बांदल यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.
यावेळी शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, महीला जिल्हा उपाध्यक्षा कुसुम पाटील, सरचिटणीस संगिता नेवे, महीला तालुका अध्यक्षा अॅड मनिषा पवार, आरोग्य सेवा सेल जिल्हा सरचिटणीस डॉ अनिरुद्ध सावळे, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, तालुका अध्यक्ष कल्पेश येवले, प्रदिप चौधरी, युवक काँग्रेसचे प्रविण पाटील, संजय सोनार आदी उपस्थित होते.
निवेदनात यात्रा ही भाविकांची श्रद्धा असुन या यात्रेवर अनेक लहान मोठे व्यापारी यांचे वर्षभराचे घराचे आर्थिक बजेट अवलंबून असतो अनेक रोजगार करणारे लोक काही महीन्यापासून या यात्रेत दोन पैसे कमावण्यासाठी स्वप्न बघत असतात. त्यामुळे ही यात्रा महत्वाची असुन येणाऱ्या काळात सावखेडा, माहेजी देवी यासह यात्रा आहेत. असे स्पष्ट देण्यात आले. यावेळी तहसीलदार कैलास चावडे, पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्याशी चर्चा करण्यात आली. यावेळी शासकीय पातळीवर परवानगी देण्यात आम्हाला हरकत नाही मात्र संबंधित यात्रा कमिटीने लेखी पत्र देऊन यात्रेला परवानगी देवु नये असे पत्र दिल्यामुळेच आम्ही हा निर्णय घेतला आहे असे पोलीस निरीक्षक श्री. नजनपाटील यांनी शिष्टमंडळाला सांगितले.
(सगळीकडे यात्रा उत्सव साजरे होत असतांनाच काकणबर्डी यात्रा उत्सव कमिटीने पत्र देऊन भाविक भक्तांना यात्रा उत्सवापासून वंचित ठेवण्याची जी भूमिका घेतली आहे. त्याबद्दल पाचोरा, भडगाव तालुक्यातील भाविक भक्तांनी नाराजी व्यक्त केली असून महाराष्ट्रात सुरु असलेली आंदोलने, मोर्चे व इतर यात्रा उत्सव होत असल्याचे या यात्रा कमिटीला ज्ञात नाही का ? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.)