कुसुंबा प्राचीन जैन अतिशय क्षेत्रात भगवान आदिनाथ आणि चंद्रप्रभ मूर्तिची चैतन्यमय वातावरणात स्थापना शेकडो भाविकांनी केला जयघोष.

गौरव जैन.(कुसुंबा)
दिनांक~३१/१२/२०२१
कुसुंबा येथील प्राचीन शताब्दीपूर्वीचे अतिशय मनोज्ञ श्री १००८ कुंथुनाथ दिगंबर जैन क्षेत्र येथील वेदी जीर्ण झाल्याने वेदी व परिसर जिर्णोध्दाराचा काम गेल्या दोनवर्षापासून सुरू आहे. मध्यंतरी कोरोना महामारी संकटामुळे कामास मंदगती मिळाली होती. वेदी नूतनीकरण आणि परिसर जीर्णोध्दारासाठी पार्श्वनाथ सेवा समितीचे पद्मावती युवा मंचच्या सहकार्यांनी प्रतिष्ठाचार्य प्रदीपकुमार मधुरशास्त्री यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनात शास्त्रीच्या मंत्रोपचारात वेदी (मुख्य) नूतनीकरणाचा कार्यक्रम संपन्न झाला.
दिनांक २७ डिसेंबर सोमवार रोजी दुपारी समारोहा निमित्ताने मंदिरात पंचामृत अभिषेक होऊन कोरोना महामारी संकट तसेच ओमायक्राँन संकट निवारणार्थ आणि विश्वसुख समृध्दीसाठी शांतीमंत्र म्हणण्यात आला. व शासनाच्या आदेशाप्रमाणे कार्यक्रम संपन्न झाल्याची माहिती कुसुंबा अतिशय क्षेत्राचे विश्वस्त आणि खान्देश जैन समाजाचे प्रसिध्दीप्रमुख खान्देश जैन पत्रकार सतीश वसंतीलाल जैन (कुसुंबा) तसेच महेंद्र हिरालाल जैन यांनी दिली.
अभिषेकानंतर मूर्तीस्थापना समारोहास १२.२५ मिनिटांनी सुरूवात झाली. मुख्य व्यासपीठावर मुख्य प्रतिमा मुलनायक कुंथुनाथ भगवानच्या आजूबाजूस प्रथम तिर्थंकर आदिनाथ भगवान आणि चंद्रप्रभू भगवान यांचीमूर्ती शास्त्रीजींच्या मंत्रोपचारात आणि जयजयकारांच्या गजराने कुथुंनाथ भगवान, आदिनाथ भगवान, चंद्रप्रभु भगवान तसेच कुसुंबा गौरव मुनीश्रींच्या आणि सुदेहसागरजी महाराजांच्या जयघोषाने महावीर मार्ग गजबजला होता. त्यामुळे परिसरात धार्मिक व मंगलमय वातावरण निर्माण झाले होते. जिर्णोध्दाराच्या कामाला प्रारंभ झाल्यापासून अनेकांनी विविध वस्तू व पदार्थांचा त्याग करण्याची शपथ घेतली. होती तर काहींनी जाप्य अनुष्ठानाची शपथ घेतली.
भाविकांनी आपापल्या पध्दतीने अध्यात्माच्या माध्यमातून मंदिराच्या पूर्ततेसाठी संकल्प केला असल्याने आता पहिल्या टप्यात काम झाले असून जवळ जवळ पुन्हा संपूर्ण कामासाठी एकवर्षाची अवधी लागेल कामास गती मिळाली असून मंदिर पूर्ततेकडे जैन समाजाचे लक्ष लागले आहे. ऐतिहासिक सोहळा एवढ्या शांततेत पद्मावती युवा मंचच्या नेमनेटक्या शिस्तबध्द संयोजनामुळे व सुव्यवस्थेत पार पडला की त्याला खरोखरच कुसुंब्याच्या इतिहासात तोड नाही.
जिर्णोध्दाराचा व्यक्तीगत प्रदीप मधुरशास्त्री यांनी या संदर्भात स्विकारलेली सत्कार्याची विधायक भूमिका आणि दाखविलेला उदार दृष्टिकोन कौतुकास्पद आहे. याकामी पारस नवनितलाल जैन, वालचंद रतनलाल जैन, स्वप्नील महेंद्र जैन, श्रुतकुमार सतिश जैन, पंकज नगिनदास जैन, राजू नवनितलाल जैन, राहुल सुंदरलाल जैन, रोशन रविंद्र जैन, चंद्रकांत शांतीलाल जैन, विपुल अशोक जैन, गौरव उल्हास जैन, राजेंद्र स्वरूपचंद जैन, प्रमोद पानाचंद जैन, मयुर रिखबचंद जैन, वर्धमान सुरेश जैन, महावीर सुभाष जैन, ओम राजेंद्र जैन, वेदांत विपुल जैन, परम शितल जैन, सुरेंद्र रतनलाल जैन, महेंद्र हिरालाल जैन, सतीश वसंतीलाल जैन, आदिन्ही विशेष परिश्रम घेतले.
[गौरव जैन यांची सत्यशोधक वृत्ती, बुद्धिकौशल्य व जैन समाजाचे धार्मिक व सांस्कृतिक कामात समाजासाठी सतत झटत असल्याने त्यांची सत्यजीत न्यूज कुसुंबा प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. म्हणून आपल्या परिसरातील सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक व इतर जनहितार्थ कार्यक्रामचे वृत्त सत्यजित न्यूज कडे प्रकाशित करण्यासाठी गौरव जैन यांच्याशी संपर्क साधावा ही नम्र विनंती त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक पुढील प्रमाणे.]
९१७५२७४९४४