आम्ही तेव्हाही पारतंत्र्यात होतो, आताही पारतंत्र्यातच आहोत.
आम्ही तेव्हाही पारतंत्र्यात होतो,
आताही पारतंत्र्यातच आहोत.
संतोष पाटील
——————————————
राष्ट्रउभारणीच्या कार्यात कृषक समाजाचा अर्थात शेतकर्यांचा फार मोठा वाटा आहे ,जेव्हा जेव्हा देशावर परकीयांची आक्रमणे झाली देश परकीय सत्तेच्या ताब्यात गेला तेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी हा कृषक समाज आपापल्या परीने वेळोवेळी आपलं योगदान देतच राहिला, दीडशे वर्ष या भारत देशावर गोर्याचे राज्य होतं या इंग्रजांच्या विरोधात जेवढे जेवढे बंड झाले असतील त्या बंडामध्ये हा शेतकरी ताकदीने उभा होता, देशातील सर्व बांधवांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्राणांची बाजी लावली आहुती दिली त्यात शेतकरी बांधव बहुसंख्य होते हे नाकारता येणार नाही, मोठमोठे जमीनदार जहागीरदार या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी झाले आपल्या जमिनी वतन त्यांनी देशाला बहाल केल्या , असंख्य प्राणांच्या मशाली विझल्या आणि मग तेव्हा कुठे ही स्वातंत्र्याची ज्योत तेवती झाली, १५ ऑगस्ट १९४७ रोजी हा अखंड भारत देश स्वातंत्र्य झाला शेतकर्यां सकट संपूर्ण देशान आनंद साजरा केला, स्वातंत्र्य स्वातंत्र्य आणि फक्त स्वातंत्र्य या एकाच ध्येयानं झपाटलेल्या कृषक समाजातील शेतकऱ्यांचा आनंद फार काळ टिकला नाही, कारण शेतकऱ्यांच्या विरोधात असलेले स्वातंत्र्यपूर्वकाळात केलेले जुलमी जीवघेणे काळे कायदे ते जसेच्या तसे स्वातंत्र्य काळातही ठेवण्यात आले, १५ ऑगस्ट १९४७ रोजी इंडिया स्वतंत्र झाला आणि १८ जून १९५१ रोजी शेतकऱ्यांचा भारत पुन्हा पारतंत्र्यात गेला २६ जानेवारी १९५० रोजी लागू झालेल्या संविधान १८ जून १९५१ रोजी दुरुस्त करण्याच्या नावाखाली बिघाड करण्यात आले दीड वर्षाच स्वातंत्र्य शेतकऱ्यांना उपभोगता आलं नाही, १५ ऑगस्ट १९४७ ते १८ जुन १९५१ म्हणजे 3वर्ष १० महीने 3दिवस, २६ जानेवारी १९५० ते १८ जुन १९५१ म्हणजे १ वर्ष ३ महीने १६ दिवस फक्त इतकेच दिवस शेतकऱ्यांन साठी स्वातंत्र्य होत. त्याच्यानंतर सार्वत्रिक निवडणुका झाल्या स्वतंत्र देश स्वतंत्र पंतप्रधान, स्वतःचं संविधान, राष्ट्रगीत, झेंडा, प्रतिज्ञा, सारं काही आलं फक्त शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळालं नाही गोर्यांनी केलेले काळे कायदे काळ्यानी जास्तच काळे केले ,अर्थात न्याय बंदी केली तेव्हापासून ते आतापर्यंत त्याचे परिणाम शेतकरी भोगत आहे, संपूर्ण भारत देशामध्ये रोज ४३ आत्महत्या होतात महाराष्ट्र मध्ये तर कहर झालेला आहे या देशातील राज्यकर्त्यांना पिकवणाऱ्या पेक्षा खाणारे महत्त्वाचे वाटतात, आज रोजी आपण पाहिलं तर सोयाबीन, गहू ,भरड धान्य, साखर, या सर्व पिकांचे काय होत आहे आपण पहात आहात, जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ चा आधार घेऊन कापसाची निर्यात बंद केलेली आहे, आपल्या देशामध्ये आपण काही बोलू शकत नाही आपल्या कष्टाचा दाम मागू शकत नाही याहून दुसरे दुर्दैव काय असेल, एवढं सगळं घडल्यानंतरही शेतकरी व शेतकरी पुत्र एकत्र येत नाही हीच मोठी शोकांतिका आहे, किसान पुत्र आंदोलन या तीन काळ्या कायद्यांच्या विरोधात कंबर कसून उभे आहे आपण फक्त सर्व शेतकऱ्यांनी त्यांना साथ द्यायची गरज आहे.
*********************
तुमचा झेंडा फडकतोय
दांडा आमच्या काळजात रोवून
पूर्वी पारतंत्र्यात होतो आम्ही
आता गुलामीत जगतोय
स्वातंत्र्यात राहून
—————————–
गोर्यांचे काळे कायदे
काळ्यांनी अधिक काळे केले
न्यायासाठी तिष्ठतो सर्जक
न्यायालय बंद झाले
——————————
नव्हतोच आम्ही स्वतंत्र
ना लाभले आम्हास स्वातंत्र्य
म्हणून पाळतो आम्ही
१८ जुन काळा दिन काळा दिन
——————————
संतोष पाटील
७६६६४४७११२