कुसुंबा जन्मभूमी असलेले आचार्य मयंक सागरजींचा ५६ वा जन्मोत्सव साजरा राहुल जैन यांच्या हस्ते द्विप प्रज्वलनाने कार्यक्रमास प्रारंभ
गौरव जैन.(कुसुंबा)
दिनांक~०५/१२/२०२१
कुसुंबा गौरव असलेले आचार्य प.पू मयंकसागरजी महाराज (कुसुंबा जन्मभूमी असलेले) यांच्या दि.३ डिसेंबर शुक्रवारी रोजी ५६ वा अवतरण दिनानिमित्त राहुल जैन यांच्या हस्ते द्विपप्रज्वलन करून विविध धार्मिक कार्यक्रमाने जन्मोत्सव साजरा करण्यात आल्याची माहिती खान्देश जैन समाजाचे प्रसिध्दी प्रमुख व जैन अतिशय क्षेत्राचे विश्वस्त सतीश वसंतीलाल जैन आणि महेंद्र हिरालाल जैन यांनी दिली आहे.
प्रातःकाली महाअभिषेक आचार्य श्री मयंकसागरजी महाराजश्रींचे पूजन नंतर करोना महामारी तसेच ओमायक्राँन महामारी संकट निवारण्यासाठी आणि विश्वात सुख समृद्धी साठी ओम राजेंद्र जैन हस्ते मंत्रोच्चाराने शांतीमंत्र वाचन केले. आचार्यश्रींची महाआरती विसर्जन पाठ नंतर रात्री संगीतकार सुजल जैन यांच्या हस्ते संगीतमय भक्तामर अनुष्ठान मध्ये ४८ द्वीप प्रज्वलनाने राहुल सुंदरलाल जैन आणि नयना सौ. जैन हस्ते प्रथम द्विप प्रज्वलीत करून संगीतमय महाआरती बहुसंख्य भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाले संगीतमय कार्यक्रमामुळे अनेकांनी कार्यक्रमास प्रतिसात देऊन आनंद व्यक्त केला. याकामी पद्मावती युवा मंच व पार्श्वनाथ सेवा समीतीने विशेष परिश्रम घेतले.