पाचोरा येथे “आमदार चषक” खुली कबड्डी स्पर्धेस प्रारंभ.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२१/०२/२०२२
पाचोरा शहरातील मानसिंगका काॅर्नर, रिक्षा स्टाॅपजवळ दि. २० फेब्रुवारी सायंकाळी ६ वाजे पासून क्रिडा क्रांती कबड्डी मंडळातर्फे “आमदार चषक” खुला गट जिल्हा कबड्डी असोसिएशन स्पर्धेचे उद्घाटन शिवसेनेचे युवानेते सुमित किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मा. नगरसेवक बशीर बागवान, सुरेश देवरे, क्रिडा संचालक मालोजीराव भोसले, न. पा. चे सेवानिवृत्त उपमुख्याधिकारी राजेंद्र पाटील, चंद्रकांत लोढाया सह शहरातील कबड्डी प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेत विजयी संघास आमदार किशोर पाटील यांच्यातर्फे प्रथम पारितोषिक २१ हजार रुपये, मा. नगरसेवक भुषण वाघ यांच्या द्वितीय पारितोषिक ११ हजार रुपये, पोलिस काॅन्स्टेबल राहुल बेहरे यांच्यातर्फे तृतीय पारितोषिक ७ हजार रुपये तर विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. भुषण मगर (पाटील) यांच्यातर्फे उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात येणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना दि. २१ फेब्रुवारी रोजी खेळविला जाणार असुन या स्पर्धेत पाचोरा, एरंडोल, जळगांव, भुसावळ येथील ११ संघांनी सहभाग नोंदविला आहे. सामन्यांमध्ये पंच म्हणून जळगांव जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पंच प्रमुख अलेक्झांडर मनी, पंच चैतराम पवार, सुनिल राणे, नयनसागर मनी, आनंद महांगडे, अनिल कोळी, रोशन पाटील, कमलेश पाटील, सुरेश महाजन, विनय चौधरी, शकील शेख हे अचुक कामगिरी करत आहे.