आझादी का अमृत महोत्सव” गरुड महाविद्यालयाच्या रासेयो एककाच्या वतीने पथनाट्य सादरीकरणाच्या माध्यमातून जनजागृती.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/०३/२०२२
जामनेर तालुक्यातील शेंदूर्णी अ.र.भा.गरुड महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या वतीने “आझादी का अमृत महोत्सव” अंतर्गत मतदार जनजागृती, व्यसनमुक्ती, बेटी बचाव बेटी पढाव या विषयांवर पथनाट्य सादरीकरण शेंदूर्णी गावात आयोजित करण्यात आले होते. शेंदूर्णी गावातील पहूर दरवाजा व गांधी चौक ह्या मोक्याच्या ठिकाणी महाविद्यालयातील रासेयो स्वयंसेवकांनी सादरीकरण केले. या पथनाट्य सादरीकरणाचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वासुदेव आर. पाटील यांच्या हस्ते झाले. त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
सदरील पथनाट्य सादरीकरणास गावातील नागरिक उपस्थित होते. नागरिकांनी रासेयो एककाच्या उपक्रमाचे कौतुक केले व उदंड प्रतिसाद दिला. या पथनाट्य सादरीकरणात महाविद्यालयातील रासेयो स्वयंसेवक महेंद्र घोंगडे, प्रतीक बोरसे, प्रथमेश जाधव, निलेश बारी, पल्लवी बाविस्कर, गायत्री पाटील, वंचिता गुजर, प्रतीक्षा गुरव, गुंजन साखला, योगिनी गुजर, ऐश्वर्या गुजर, रंजना कुमावत, वैष्णवि खाकरे यांनी कृतीयुक्त सहभाग नोंदवला.
या प्रसंगी महाविद्यालयातील उपप्राचार्य प्रा. डॉ. संजय भोळे, प्रा डॉ. श्याम साळुंखे, प्रा. अमर जावळे, प्रा. डॉ. आर. डी. गवारे व इतर मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेच्या आयोजनासाठी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. दिनेश प्रकाश पाटील, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. वसंत एन. पतंगे, प्रा. डॉ. योगिता चौधरी व विद्यार्थी अविनाश भारुडे यांनी परिश्रम घेतले.