गरुड महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/०२/२०२२
धी.शेंदूर्णी सेकं.एज्यु.को-ऑप सो.शेंदूर्णी संचलित अ.र.भा.गरुड महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना एकक, आय क्यू. ए. सी. व ग्रंथालय विभागा यांच्या संयुक्त विद्यमाने “आझादी का अमृत महोत्सव” अंतर्गत ‘स्वामी विवेकानंद यांच्या जीवन व कार्य या विषयावर ग्रंथ प्रदर्शन’ महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले होते.
या ग्रंथ प्रदर्शनीचे उदघाटन अ.ग.र.ग.उच्चमाध्यामिक विद्यालयाचे प्राचार्य श्री.एस.पी.उदार यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वासुदेव आर.पाटील हे उपस्थित होते. त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या विवेक रथासोबत श्री.दामोदर भट व संतोष बाबर हे रामकृष्ण मिशन द्वारा उपस्थित होते. त्यांचा सत्कार महाविद्यालयाच्या वतीने व रासेयो एककाच्या वतीने करण्यात आला. त्यांनी विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंद यांच्या विविध ग्रंथांची ओळख करून दिली.
सदरील ग्रंथ प्रदर्शनात स्वामी विवेकानंद यांच्या जीवन व कार्यावर प्रेरणादायी साहित्य उपलब्ध होते. या ग्रंथ प्रदर्शनिस विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी ग्रंथ प्रदर्शनातून ग्रंथ, प्रेरणादायी साहित्य खरेदी केले व वाचनाचा संकल्प व्यक्त केला. तसेच महाविद्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या संधी बद्दल आभार व्यक्त केले. या प्रसंगी महाविद्यालयातील उपप्राचार्य प्रा.डॉ.संजय भोळे,प्रा डॉ.श्याम साळुंखे, प्रा.एन.एस.सावळे, प्रा.डॉ.प्रशांत देशमुख, प्रा.दिपक पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेच्या आयोजना साठी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.दिनेश प्रकाश पाटील, ग्रंथपाल श्री.धम्मा धारगावे यांनी, विद्यार्थी निलेश बारी, प्रथमेश,महेंद्र घोंगडे, प्रतीक बोरसे, गायत्री पाटील, निकिता गुजर व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.