कुऱ्हाड येथील आदर्श माध्यमिक विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न.

सुनील लोहार.(कुऱ्हाड)
दिनांक~२५/०२/४०२३
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द येथील आदर्श माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आज सकाळी पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक श्री. माधव कोटकर हे होते. विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शाळा व शिक्षकांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली. काहींना शाळेचा आपला शेवटचा दिवस म्हणून अश्रू अनावर झाले होते. शिक्षक सुहास मोरे, श्रद्धा पाटील व पी. एच. पाटील. यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले श्री. एम. एन. कोटकर सर यांनी विद्यार्थ्यांना भविष्यकालीन यश संपादनासाठी कसून अभ्यास करण्याचा सल्ला दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. एम. पाटील. सर यांनीही विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन करत भविष्यात खूप चांगले शिक्षण घेऊन, विविध क्षेत्रात करिअर करावे जेणेकरून आई, वडिलांचे, गावाचे व शाळेचे नाव उज्ज्वल होईल असे सुचविले.
सूत्रसंचालन आर. एस. माळी. सर तर आभार प्रदर्शन सुधाकर गायकवाड सर यांनी केले.